मुंबई - लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उद्योग व व्यवसायातील प्रभावित कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार व बेघर व्यक्ती यांच्या दोन वेळच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न सुटावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 'कम्युनिटी किचन' हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात अधिक सुसुत्रता यावी, खाद्यपदार्थांच्या वाहतूकीसाठी लागणारा वेळ वाचावा व लोकांना ताजे अन्न मिळावे, यासाठी प्रभागनिहाय कम्युनिटी किचन सुरु करण्याचे निर्देश मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पत्राद्वारे महानगरपालिकेस दिले आहेत.
मुंबईत प्रभागनिहाय 'कम्युनिटी किचन' सुरु करा - पालकमंत्री अस्लम शेख - कम्युनिटी किचन
उन्हाळ्यामुळे खाद्यपदार्थ लवकर खराब होतात. त्यामुळे मुंबईत कम्युनिटी किचन प्रभागनिहाय सुरु करण्याचे निर्देश मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत.
पालकमंत्री अस्लम शेख
हेही वाचा -...बाकी योगी महाराजांचे बरे चालले आहे!