महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 16, 2019, 8:39 PM IST

ETV Bharat / state

राज्यातील 100 गावांमध्ये साकारणार समूह गृहनिर्माण प्रकल्प - मिरगणे

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाकडून सर्वांना हक्काचे घर मिळावे, या हेतूने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यभरात मोठ्या संख्येने घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या वर्षाच्या डिसेंबर अखेर 5 लाख घरांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात येणार आहे.

राजेंद्र मिरगणे, सहअध्यक्ष महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ

मुंबई -राज्यातील 100 गावांमध्ये समूह गृहनिर्माण प्रकल्प (ग्रुप हौसिंग) राबवून स्मार्ट व्हिलेज साकार करण्यात येणार आहेत. पथदर्शी प्रकल्प म्हणून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाकडून सर्वांना हक्काचे घर मिळावे, या हेतूने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यभरात मोठ्या संख्येने घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या वर्षाच्या डिसेंबर अखेर 5 लाख घरांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी दिली.

राजेंद्र मिरगणे, सहअध्यक्ष महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे-2022’ या संकल्पनेतून ‘प्रधानमंत्री आवास योजना- सर्वांसाठी घरे (शहरी)’ ही योजना राबविण्यात येत आहे. त्यातून महाराष्ट्रासाठी 19.40 लाख घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेला गती देण्याच्या उद्देशाने राज्यात डिसेंबर 2018 मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या महामंडळाला राज्यात 5 लाख परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. महामंडळाने नुकतेच पुणे येथे 10 हजार घरांच्या आणि भुसावळ येथे 5 हजार घरांच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. सोलापूर येथे 11 हजार हजार घरांच्या प्रकल्पाला या महिन्यात मान्यता देण्यात येईल. याशिवाय 75 हजार घरांचे प्रकल्प मान्यता प्रक्रियेत आहेत. डिसेंबर अखेर 5 लाख घरांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मिरगणे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details