मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. त्यामुळे नागरिक घरातच बसून आहेत. त्यामुळे वन्यजीव, प्राणी नागरी वस्तीत येत आहेत. मागील आठवड्यात मुंबईकरांना मोराने दर्शन दिल्यावर, आता एका ग्रे हॉर्न बिल ह्या पक्षाने दर्शन दिले आहे.
मुंबईकरांना मोरानंतर ग्रे हॉर्नबिलचे दर्शन... हेही वाचा-#Corona: कल्याण-डोंबिवलीत आणखी तीन रुग्ण; सहा महिन्यांचे बाळही 'पॉझिटिव्ह'
देशात कोरोनामुळे लाॅकडाऊन असताना, संपूर्ण जनता ही घरात आहे. मुंबई सारख्या महानगरात जिथे एरवी पाय ठेवायला जागा नसते तिकडे रस्त्यावर स्मशान शांतता अनुभवायला मिळते आहे. मात्र, त्यामुळे नव्यजीन नागरि वस्तीत येत आहेत.
मागील आठवड्यात मुंबईकरांना मोराने दर्शन दिल्यावर, मुंबईकरांना एका नवीन पाहुण्याने भेट दिली. मुंबईतील अल्टामाऊंट मार्गावर ग्रे हॉर्न बिल ह्या पक्षाने मुंबई करांचे लक्ष वेधून घेतले आहे. ग्रे हॉर्नबिल हा साधारण हॉर्नबिल असून भारतीय उपखंडात तो सर्वात जास्त आढळतो.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 12 वा दिवस आहे.