महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे 500 रुपये अनुदान - धान उत्पादक

२०१९-२० या हंगामातील धान (तांदूळ) उत्पादकांसाठी केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. तथापि धान उत्पादनाच्या खर्चात वाढ झाली आहे.

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Dec 10, 2019, 8:17 PM IST

मुंबई- राज्यातील धान (तांदूळ) उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रति क्विंटल 500 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

हेही वाचा -राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

२०१९-२० या हंगामातील धान उत्पादकांसाठी केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. तथापि धान उत्पादनाच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यावर शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक होते. त्यानुसार राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना 50 क्विंटलच्या मर्यादेत प्रति क्विंटल 500 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना २०१९-२० मधील पणन हंगामात मोठा दिलासा मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details