मुंबईGram Panchayat Elections 2023 : नांदेड जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतींमध्ये सर्वात्रिक तसंच 25 जागेवर पोटनिवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 81.37 टक्के मतदान झालं. उद्या सोमवारी (6 नोव्हेंबर) मतमोजणी होणार आहे. त्यामुळं गुलाल कोण उधळणार याकडं सर्वांच लक्ष लागलंय.
मांडळमध्ये दोन गटात वाद :धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मांडळमध्ये दोन गटात वाद झाला. दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांनी मतदारांच्या उमेदवाराच्या चिन्हावर आक्षेप घेतल्यानं दोन्ही गट आमनेसामने आले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वाद मिटला.
अहमदनगर जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतींसाठी मतदान : अहमदनगर जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडलं सर्व 732 मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पडलं. जिल्ह्यात 1 हजार 701 सदस्यपदासाठी 3 हजार 995 उमेदवारांचे तर सरपंचपदासाठी 610 उमेदवारांचं भवितव्यही मतपेट्यात बंद झालंय.
नक्षलग्रस्त भागातही मतदानाचा उत्साह :गोंदियातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातही नक्षलग्रस्त भागात मतदारांचा उत्साह दिसून आला. येरंडी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत 88 टक्के मतदान झालं. गोंदियातील इतर तीन ठिकाणीही मतदान शांततेत पार पडलं.