महायुतीच्या विजयावर शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांची प्रतिक्रिया मुंबईGram Panchayat Election 2023 : बारामती तालुक्यातील एकूण २८ ग्रामपंचायतींपैकी २६ ग्रामपंचायतींमध्ये अजित पवार गटाला यश मिळालं आहे. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये देखील मतदान झालेल्या ८९ ग्रामपंचायतीत अजित पवार गटानं शरद पवार गटाला धक्का दिला आहे. दरम्यान, राज्यातील ग्रामपंचायत निकालावर राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत असताना, आता शिंदे गटाची देखील यावर प्रतिक्रिया आली आहे. (Shinde group success in elections)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नेतृत्व जनतेला मान्य :दरम्यान, महायुतीनं ग्रामपंचायतीत चांगलं यश मिळवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आहे. त्यांचं नेतृत्त्व जनतेनं मान्य केलं आहे. त्याचाच हा परिपाक आहे. तसंच विरोधी पक्षानं म्हटलं होतं की, या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होईल. मात्र महायुतीनं घवघवीत यश मिळवलं आहे. येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीची ही एक लिटमस लेस्ट होती. या टेस्टमध्ये महायुती पास झाली आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी दिली आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला :या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये अनेकांनी बाजी मारली आहे. तर अनेकांना धक्का बसला आहे. कोकणात मंत्री दीपक केसरकर यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे आमदार नितेश राणे यांच्या पॅनेलला चांगलं यश मिळालं आहे. कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पॅनेलला आमदार आंबिटकर यांनी धक्का देत विजय मिळवला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पॅनेलने प्रतिष्ठा राखत अनेक जागांवर विजयी झाले आहेत.
अरुण सावंत यांची प्रतिक्रिया :विरोधी पक्षाने म्हटलं होतं की, या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होईल. मात्र महायुतीनं घवघवीत यश मिळवलं आहे. येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीची ही एक लिटमस लेस्ट होती, या टेस्टमध्ये महायुती पास झाली आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी दिली आहे.
हेही वाचा:
- Gram Panchayat Result २०२३ : ग्रामपंचायत निकालावरुन नाना पटोलेंचा भाजपावर हल्लाबोल; कोण नंबर वन?
- Gram Panchayat Election 2023 : जनतेचा कौल महायुतीच्या पारड्यात - केशव उपाध्ये
- Gram Panchayat Maharashtra Elections २०२३ : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची घोडदौड सुरू, 65 जागांवर आघाडी