मुंबई -कोरोनामुळे देशात 17 मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. घरातील धान्य संपत आले आहे, अशा नागरिकांच्या मदतीसाठी विक्रोळी भागातील बौद्ध बांधव पुढे आले आहेत. 108 गरजू कुटुंबांना आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त धान्य वाटप करण्यात आले.
बुद्धपौर्णिमेनिमित्त गरजुंना मोफत धान्याचे वाटप - बौद्धपौर्णिमा
गेले दोन महिने सर्व काही बंद असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना रोजगार मिळत नाही. जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित राहिला आहे.
गेले दोन महिने सर्व काही बंद असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना रोजगार मिळत नाही आहे. जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित राहिला आहे. अशा कामगारांना मदत म्हणून समाजसेवक आनंद घोक्षे, मिलिंद गवारे, भुपेंद्र हिरे हे पुढे आले आहेत. देणगीच्या माध्यमातून धान्य जमा करून ते गरजूंपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत.
लॉकडाऊन काळात रिक्षाचालक आणि छोटे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना छोटीशी मदत म्हणून आम्ही धान्य वाटप करण्याचे ठरविले. यासाठी आम्ही बौद्ध बांधवांना धान्य देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन केले. याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 100 पेक्षा जास्त कुटुंबाना धान्य मिळेल इतके धान्य जमा झाले. तसेच नियमाचे पालन करत आम्ही हे धान्य लोकांना दिले आहे. गरजू लोकांपर्यंत ही मदत पोहोचली याचा आनंद आहे, असे भुपेंद्र हिरे यांनी सांगितले.