मुंबई -कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनने राज्यातील सर्वसामान्य नागरिक, महिला, कष्टकरी यांना प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. अनेक नागरिकांनी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यासाठी सवलत देऊनही काही खासगी वित्तीय संस्था वसुलीचा तगादा लावत आहेत. कर्ज वसुलीसाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकाकडून धमकावण्याचा प्रकारही सुरू आहे, यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने याची दखल घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
रोहित पवार यांनी राज्यातील खासगी वित्तीय संस्थांकडून कर्जाच्या वसुलीसाठी होत असलेल्या तगादा आणि त्यासाठीच्या दहशतीसंदर्भात तातडीने दखल घेण्याची मागणी ट्वीट करून गृहमंत्र्यांकडे केली आहे. राज्यातील ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर आणि इतर असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना अनेक खासगी वित्तीय संस्था, (फायनान्स) मोठ्या प्रमाणात कर्ज देत असतात. ग्रामीण भागातील नागरिकांना या खासगी वित्तीय संस्थांकडून देण्यात आलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी अनेकदा या कंपन्या गुंड प्रवत्तीच्या लोकांचा वापर करून धमकावण्याचे प्रकारही करत असतात.
कर्ज वसुलीच्या गैर प्रकारामध्ये लक्ष घालावं; आमदार रोहित पवारांची गृहमंत्र्यांकडे मागणी - बँक हप्त्याविषयी बातम्या
राज्यातील ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर आणि इतर असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना अनेक खासगी वित्तीय संस्था, (फायनान्स) मोठ्या प्रमाणात कर्ज देत असतात. त्या कर्जाची वसुली या कंपन्या गुंड प्रवत्तीच्या लोकांचा वापर करून कर्जदाराला धमकावून करतात. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्याकडे केली आहे.
कर्ज वसुली पथकांच्या अरेरावी आणि त्यांच्या वागणुकीचा महिला, बालक आणि वृध्दांना मानसिक त्रास सोसावा लागतो. यामुळे असंख्य कुटुंबांचे या दरम्यान जगणे कठीण झाल्याने, याची दखल सरकारने घ्यावी म्हणून राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी ट्वीट करून राज्यातील सर्वसामान्य कर्जदारांवर होत असलेल्या अन्यायाची वाचा फोडली आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे असंख्य नागरिकांसमोर कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी मोठे संकट उभे राहिले आहे. याची दखल घेत सरकारने बँकांना कर्ज वसुलीबाबत अनेक निर्देश दिले आहेत. असे असले तरी याकडे खासगी वित्तीय संस्था दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहेत. राज्यातील सर्वसामान्य कर्जदारांची व्यथा लक्षात घेऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही आमदार पवार यांनी केली आहे.