मुंबई -कोकण किनारपट्टीसह इतर काही जिल्ह्यांमध्ये चार दिवसांपूर्वीनिसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले. या वादळामुळे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, पुणे, नाशिक आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये शाळांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या शाळांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या सर्व जिल्ह्यांतील शिक्षणाधिकाऱ्यांची एक बैठक आजवर्षा गायकवाड यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतली.
चक्रीवादळामुळे पडझड झालेल्या शाळांचे तातडीने पंचनामे करा, वर्षा गायकवाड यांचे आदेश
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, पुणे, नाशिक आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये शाळांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या शाळांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या सर्व जिल्ह्यांतील शिक्षणाधिकाऱ्यांची एक बैठक आज वर्षा गायकवाड यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतली.
या बैठकीत प्रत्येक जिल्हानिहाय किती शाळांचे नुकसान झाले याविषयीची माहिती त्यांनीघेतली. निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वात जास्त शाळांची पडझड ही रायगड जिल्ह्यात झालेली आहे. या जिल्ह्यातील शाळांना लवकरच भेट देणार देणार असल्याचे गायकवाड म्हणाल्या. राज्यात येत्या काही दिवसांत ग्रामीण भागातील शाळा आणि त्यांच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चक्रीवादळामुळे पडझड झालेल्या शाळांची दुरुस्ती तातडीने कशी करता येईल, यासाठीच्या सर्व उपायोजना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे आणि मुंबई विभागातील शिक्षणाधिकारी उपस्थित होते.