बेकायदा जमीन खरेदी प्रकरण मुंबई :शेतकरी नसलेल्या मुंबईच्या व्यक्तीने शेकडो एकर जमीन कोट्यावधी रुपयांना विकत (Govt imposed fine) घेतली. हे कवडीमोल भावाने कसे काय शक्य झाले. शासनाच्या आदेशानुसार पंधरा दिवसात दोन कोटी रुपये दंड (warning of govt action) जमा करा. नाहीतर पुढील कारवाई होणार असा सूचक इशारा शासनाकडून देण्यात आला आहे. (Latest news from Mumbai) या संदर्भात वकील नंदू पवार यांनी याचिका दाखल केली होती.
काय आहे प्रकरण? -टेमटन मेनू अंकलेश्वर या आणि शिरीन मेनू अंकलेश्वर हे पेशाने वकील असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. यांनी ठाणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये शेकडो एकर जमीन कवडीमोल भावाने बेकायदा रीतीने विकत घेतली. जो शेतकरी नाही. त्याला शेतजमीन अशी बेकायदा विकत घेता येत नाही. त्यामुळेच मुंबईतील दादर भागात राहणारे वकील व्यवसायात असणाऱ्या व्यक्ती शेतकऱ्यांच्या जमिनी विकत कशा घेऊ शकतात असा प्रश्न जाणकारांना नक्कीच पडतो.
शेतजमीनीची बेकायदा खरेदी :ठाणे जिल्ह्यातील बदलापूर व चामटोली आणि तासगाव अशा काही खेड्यांमधील शेकडो एकर जमीन या अंकलेश्वर या कुटुंबाने विकत घेतली. ही शेतजमीन विकत घेतली ती कायद्याचे उल्लंघन करूनच. ज्या शेतकऱ्यांना ह्या कायद्याची माहिती नव्हती त्यांना भुलवून फसवून टेंमटन अंकलेश्वरीया यांनी ही शेत जमीन विकत घेतली. आणि याची माहिती मिळताच तक्रारदार नंदकुमार पवार यांनी शासनाकडे यासंबंधी तक्रार केली.
शेतजमीन कायद्याचे उल्लंघन :मुंबई कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम 1948 कलम 84 क नुसार अंकलेश्वर या कुटुंबाने कवडीमोल भावात शेतकरी नसताना शेतजमीन जमीन खरेदी करणे हा गुन्हा ठरला. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील मौजे चामटवली येथील सर्वे नंबर 12/8 26/1 26/2 अ 42/ एक आणि 42/4 याशिवाय अनेक सर्वे क्रमांक असलेली शेकडो कर जमीन विकत घेतली. तसेच मौजे कासगाव तालुका अंबरनाथ या ठिकाणच्या देखील शेतजमीन त्यांनी विकत घेतलेली आहे.
बाजार भावनुसार ठोठावला दंड :महाराष्ट्र शासनाच्या 2016 च्या कायद्यानुसार बाजारभाव प्रमाणे या जमिनीचे बाजार मूल्य दुय्यम निबंधक निबंधाकडील नियमानुसार प्रति चौरस मीटर रुपये 1100 असा दर आहे. त्यानुसार 121 चौरस वाराचा म्हणजे एक गुंठा भाव हा एक लाख 33 हजार 100 रुपये येतो. याप्रमाणे दोन्ही जमिनीचे क्षेत्र २०३.७० गुंठे म्हणजेच त्याचे आजचे बाजार मूल्य रुपये दोन कोटी 71 लाख 12 हजार 470 इतके येते. म्हणून एवढी रक्कम टेमटेन मिनू अंकलेश्वरिया शिरीष मिनू उर्फ शिरीन सॅम जिजिया,रुबी टेमटन अंकलेश्वरिया, मिनू नादिरशा अंकलेश्वरिया,डायना मिनू अंकलेश्वरीया यांनी शासनाच्या तिजोरीत पंधरा दिवसात जमा करावे नाहीतर शासन ही मिळकत शासन जमा जप्त करेल ;असा आदेश देखील शासनाच्या वतीने नुकताच देण्यात आलेला आहे.
शेतजमीन विकत कशी घेतली :यासंदर्भात या फसवणुकीच्या बाबतीत तक्रारदार नंदकुमार पवार यांनी ईटीव्ही भारत सोबत बातचीत करताना ही माहिती उघड केली. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील शेकडे कर जमीन शेतकरी नसलेल्या टेम्पटन मेनू अंकलेश्वर या आणि त्यांच्या कुटुंबाने विकत घेतली. दरिद्री असलेल्या शेतकऱ्यांकडून त्यांना फसवून ही जमीन त्यांनी विकत घेतली. हे टॅमटन अंकलेश्वर या पेशाने स्वतः वकील आहे आणि मुंबई वकील असोसिएशनचे ते पदाधिकारी देखील असल्याचं माझ्या ऐकिवात आहे. तसेच यांनी जमीन घेतली त्याबाबत स्थानिक लोकांनी खूप तक्रारी केल्या होत्या. माहिती अधिकारात मी माहिती मिळवली आणि त्यामध्ये ही माहिती समोर आली की सदर व्यक्ती आणि त्यांचे कुटुंब हे शेतकरी नाहीत. यांनी मुंबई कुळ वहिवाट कायद्याचे उल्लंघन केलेले आहे त्याच्यामुळे हे जमीन कवडीमोल भावात कशी काय विकत घेऊ शकतात.
तहसीलदार यांचे म्हणणे :यासंदर्भात अंबरनाथ येथील तहसीलदार प्रशांती माने यांनी ईटीवी भारतसोबत बातचीत करताना सांगितले की," सदर प्रकरण आमच्यापर्यंत आले होते. शासनाचा आदेश तसेच मुंबई कुळवहिवाट कायदा मधील कलम 84 क यानुसार सदर प्रकरणात तक्रारदारांची तक्रार वैध होती. त्यामुळे आम्ही त्याची तपासणी व चौकशी करून संबंधित बेकायदा जमीन व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना 5 डिसेंम्बर रोजी सक्त आदेश पाठवलेला आहे. त्यांनी जर आदेशानुसार शासनाच्या तिजोरीत 15 दिवसात दंड केलेली रक्कम जमा केली नाही; तर सदर मिळकत शासन जमा करण्यात येईल."