महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासगी रुग्णालयांना दिलासा! सरकारने नूतनीकरणाची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली - मुंबई लेटेस्ट अपडेट

बॉम्बे नर्सिंग होम कायदा 1949 नुसार राज्यातील सर्व खासगी आस्थापनांना (रुग्णालय, दवाखाना, नर्सिंग होम, डे केअर सेंटर) 31 मार्चपर्यंत नूतनीकरण करावे लागते. मात्र, यंदा त्याआधीच लॉकडाऊन सुरू झाल्याने सर्व कार्यालये बंद असल्याने मोठ्या संख्येने खासगी रुग्णालयांचे नूतनीकरण झालेले नाही. सरकारने 31 जुलैपर्यंत यासाठी मुदतवाढ देत खासगी रुग्णालयांना मोठा दिलासा दिला आहे.

Renewal
नूतनीकरण

By

Published : May 27, 2020, 3:33 PM IST

मुंबई - बॉम्बे नर्सिंग होम कायदा 1949 नुसार राज्यातील सर्व खासगी आस्थापनांना (रुग्णालय, दवाखाना, नर्सिंग होम, डे केअर सेंटर) नूतनीकरण करण्यासाठी अखेर राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. 31 मार्चपर्यंत नूतनीकरण करावे लागते. मात्र, यंदा त्याआधीच लॉकडाऊन सुरू झाल्याने सर्व कार्यालये बंद असल्याने मोठ्या संख्येने खासगी रुग्णालयांचे नूतनीकरण झालेले नाही. सरकारने 31 जुलैपर्यंत यासाठी मुदतवाढ देत खासगी रुग्णालयांना मोठा दिलासा दिला आहे.

राज्यात वैद्यकीय आस्थापना चालवण्यासाठी नूतनीकरण आवश्यक असते. दरवर्षी 31 मार्चपर्यंत नूतनीकरण न केल्यास वैद्यकीय आस्थापनांना बेकायदेशीर ठरवत त्यांच्याविरोधात कारवाई केली जाते. त्यामुळे हे नूतनीकरण बंधनकारक असते. मात्र, 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू असून त्याआधीच आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोनासाठी काम करत आहेत. त्यामुळे नूतनीकरणाचे काम ठप्प आहे. अशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रुग्णालये सुरू ठेवणे गरजेचे आहे. तेव्हा या नूतनीकरणासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने, महाराष्ट्रने सरकारकडे केली होती.

ही मागणी मान्य करत 31 जुलैपर्यंत नूतनीकरणासाठी सरकारने मुदतवाढ दिल्याची माहिती आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details