मुंबई:देशातून पळून जाण्याच्या पूर्वी विजय मल्ल्याकडे त्याच्या डोक्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठीचा पैसा होता आणि म्हणूनच परदेशामध्ये विजय मल्ल्याने मालमत्ता खरेदी केल्या. सीबीआयने आपल्या याचिकेतील आरोप पत्रात म्हटले आहे की, विजय मल्ल्या हा फसणूक करणारा व्यक्ती आहे. अशा परिस्थितीमध्ये किंगफिशर एल लाईनला रोख रक्कमेची गरज असतानाही तिथे पैशाची मदत केली गेली नाही. ही वेळ अशी होती की, विजय मल्ल्याने कर्जाची परतफेड केली नाही. हे बँकांनी म्हटल्याचे देखील सीबीआयने आपल्या आरोप पत्रात नमूद केले आहेत. उक्त आरोप केंद्रीय अन्वेषण ब्युरोने दाखल केलेल्या पुरवणी आरोप पत्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयात केला.
कर्जफेडीसाठी पुरेसा पैसा होता: किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडसाठी विजय मल्ल्याने बँकांकडून कर्ज घेतले. त्यावेळेला म्हणजे 2008 ते 2017 या कालावधीमध्ये बँकांची कर्जाची परतफेड करण्यासाठी पुरेसा पैसा होता. हे देखील सीबीआयने आरोप पत्रात अधोरेखित केले. हे करत असतानाच विजय मल्ल्याने युरोपमध्ये स्वतःसाठी मालमत्ता देखील विकत घेतली. त्यासोबत स्वित्झर्लंडमध्ये त्याच्या मुलाच्या नावे पैसे हस्तांतरित केले. सीबीआयला ही माहिती विविध देशांना ज्या वेळेला त्याबाबत विनंती पत्र पाठवले आणि विजय मल्ल्याने जो काही बँकेचा आणि पैशाचा व्यवहार केला, त्याचा तपशील मागवल्यानंतर सीबीआयकडे ही ठोस माहिती प्राप्त झाली आहे, असे देखील सीबीआयने नमूद केले.
मालमत्ता खरेदीची सीबीआयला माहिती: विजय मल्ल्या हा 900 कोटीपेक्षा अधिक रुपये आयडीबीआय बँक, किंगफिशर एअरलाइन्स कर्ज फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपी देखील आहे, असे सीबीआयचे म्हणणे आहे. तसेच 2016 मध्ये तो देश सोडून गेला. त्यावेळेला तो इंग्लंडमध्ये राहतो, असे समोर आले होते. त्यावर खटला तर सुरू आहे. एजन्सीला हे माहिती कळाली होती की, मल्ल्याने फ्रान्समध्ये कोट्यावधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती आणि गिज्मा होल्डिंग या त्याच्या एका कंपनीच्या खात्यातून आठ दशलक्ष युरो भरण्याची मागणी केली गेली होती. हा देखील तपशील प्राप्त झाला आहे, हे सीबीआयने नमूद केले.
दीडशे कोटींची फसवणूक:माजी जनरल मॅनेजर असलेला बुद्धदेव दास गुप्ता जो की, आयडीबीआयचा प्रमुख व्यवस्थापक होता. त्याच्यासह अकरा आरोपींची नावे सीबीआयने आपल्या आरोपपत्रात नमूद केली. आयडीबीआयच्या मॅनेजरने कथितपणे आपल्या पदाचा गैरवापर केला आणि आयडीबीआय विजय मल्ल्या यांनी कट रचून 2009 मध्ये दीडशे कोटी रुपयांनी फसवणूक केली, असे देखील सीबीआयने आपल्या पुरवणी आरोप पत्रात नमूद केले. विजय मल्ल्याने किंगफिशर एअरलाइन्ससाठी दीडशे कोटी रुपयांचे जे कर्ज घेतले होते, ते आधीच्या 750 कोटी रुपयांच्या कर्जातून समायोजित केले जाणार. त्यामुळे ही फसवणूक असल्याचे देखील सीबीआयचे म्हणणे आहे. ही बाब क्रेडिट समितीने स्वतंत्र कर्ज म्हणून याची नोंद केली; परंतु ते स्वतंत्र कर्ज नाही, असे दर्शवण्याचा प्रस्तावात बदल झाला. तेव्हा ही माहिती उघड झाली. ही देखील महत्त्वाची बाब सीबीआयने अधोरेखित केली आहे.