महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यपालांना कंगणाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही - शरद पवार

राज्यापालांना कंगणाला भेटायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर केली.

governor has time to meet kangana, but no time to meet farmers said sharad pawar
'राज्यापालांना कंगणाला भेटायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही'

By

Published : Jan 25, 2021, 3:31 PM IST

Updated : Jan 25, 2021, 4:11 PM IST

मुंबई - राज्यापालांना कंगणाला भेटायला वेळ आहे, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली. ते आझाद मैदानात आयोजित शेतकरी मोर्चाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला धडा शिकवायला हवा, असे आवाहन त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले.

शरद पवार यांची प्रतिक्रिया

शेतकरी तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही -

आजची शेतकऱ्यांची रॅली ही देशातली ऐतिहासिक रॅली आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच सरकारने चर्चा न करता नवे शेतकरी कायदे संसदेत पारित करून घेतले आहेत. चर्चा न करता असे कायदे आणणे हा घटनेचा अपमान असून शेतकरी तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही , असेही ते म्हणाले.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त -

जीप, ट्रॅक्टर अशा आपल्या वाहनांसोबत या मोर्चामध्ये 15 हजारांपेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत.

हेही वाचा - शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू ठेवून प्रजासत्ताक दिनी देश अशांत ठेवायचाय का?

Last Updated : Jan 25, 2021, 4:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details