मुंबई - माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
सुषमा स्वराज करिश्मा लाभलेल्या महिला राष्ट्रीय नेत्या - राज्यपाल चे. विद्यासागर राव - former external affairs minister sushma swaraj
माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी तीव्र आपल्या भावना व्यक्त केल्या.
![सुषमा स्वराज करिश्मा लाभलेल्या महिला राष्ट्रीय नेत्या - राज्यपाल चे. विद्यासागर राव](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4064495-thumbnail-3x2-ss.jpg)
सुषमा स्वराज या स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासातील लोकप्रिय राष्ट्रीय महिला नेत्यांपैकी एक होत्या. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत धारण केलेल्या प्रत्येक पदावर त्यांनी आपल्या प्रतिभेची मोहर उठवली. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्यासोबत काम करण्याची बहुमोल संधी मला मिळाली.
त्या कुशल संघटक होत्या व अनेक राजकीय आंदोलनामध्ये माझ्या पाठीशी कणखरपणे उभ्या राहिल्या. सुषमाजी उत्तम वक्त्या होत्या. तेलुगू-भाषिक प्रदेशांमध्ये अनेक जाहीर सभांमध्ये त्यांच्या भाषणांचा अनुवाद करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्या निधनामुळे देशाने करिश्मा लाभलेल्या राष्ट्रीय नेत्या तसेच उत्कृष्ट संसदपटू गमावल्या आहेत, असे राज्यपाल विद्यासागर राव यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.