महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जे. जे. रुग्णालयात घेतली कोविडवरील लस - Governor Bhagat Singh Koshyari took covaxin

राज्यपालांनी आज जे. जे. रुग्णालयात कोव्हॅक्सिन लस घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर आणि डॉ. विजय सुरासे उपस्थित होते. दरम्यान, देशात निर्मिती झालेल्या आणि सध्या देण्यात येणाऱ्या दोन्ही लसी सुरक्षित असून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Governor Bhagat Singh Koshyari took covaxin
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतले कोव्हॅक्सिन

By

Published : Mar 5, 2021, 1:53 PM IST

मुंबई - राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जे. जे. रुग्णालयात कोरोनाविरोधी लस टोचून घेतली. भारतीय लस म्हणून ओळखली जाणारी 'कोव्हॅक्सिन' ही लस त्यांनी घेतली आहे.

तिसऱ्या टप्प्याला राजकीय मंडळींचा प्रतिसाद

कोरोना लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरवात झाली आहे. प्राथमिकतेनुसार, आधी कोरोना योद्धे अर्थात डॉक्टर-नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्करना लस देण्यात येत आहे. अशात 1 मार्चपासून सर्वसामान्यांसाठी लस उपलब्ध झाली आहे. 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्यांना लस देण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार, तिसऱ्या टप्प्यात 1 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेतली. त्यांनी स्वदेशी कोव्हॅक्सिन लस घेतली. तर, याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी जे. जे. रुग्णालयात लस घेतली. यानंतर देशात आणि राज्यात राजकीय मंडळी लस घेण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत.

लस सुरक्षित आहे, लस घ्या - राज्यपाल

राज्यपालांनी आज जे. जे. रुग्णालयात कोव्हॅक्सिन लस घेतली. या वेळी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर आणि डॉ. विजय सुरासे उपस्थित होते. दरम्यान, देशात निर्मिती झालेल्या आणि सध्या देण्यात येणाऱ्या दोन्ही लसी सुरक्षित असून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details