महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्राचीन भारतीय साहित्य हे ज्ञान-विज्ञानाचे अथांग भांडार’

“प्राचीन भारतीय साहित्यातील विज्ञान-तंत्रज्ञान व साथरोग विषयक संदर्भ” या विषयावरील दोन दिवसांच्या चर्चासत्राचे (वेबिनार) उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांनी आज (बुधवार) राजभवन, मुंबई येथून केले. यावेळी बोलताना ते प्राचीन भारतीय साहित्य हे ज्ञान विज्ञानाचे अथांग भांडार आहे, असे म्हणाले.

भारतीय प्राचीन साहित्य हे ज्ञान-विज्ञानाचे अथांग भांडार’: राज्यपाल
भारतीय प्राचीन साहित्य हे ज्ञान-विज्ञानाचे अथांग भांडार’: राज्यपाल

By

Published : Jun 24, 2020, 7:47 PM IST

मुंबई - प्राचीन भारतीय साहित्य हे ज्ञान विज्ञानाचे अथांग भांडार आहे. वेद, उपनिषद, दर्शनशास्त्र, योगशास्त्र यांसारखे असंख्य मोती या महासागरात आहेत. हे ज्ञान अनमोल, शाश्वत व सनातन आहे. ‘चीरपुरातन – नित्यनूतन’ असे त्याचे वर्णन केले जाते. त्यामुळे प्राचीन भारतीय साहित्याचे नव्याने अध्ययन – संशोधन करून विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरेल. ते ज्ञान जगापुढे मांडले गेले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

देवभूमी विचार मंच उत्तराखंड व उत्तराखंड मुक्त विश्वविद्यालय, हल्दवानी, नैनीताल यांनी आयोजित केलेल्या “प्राचीन भारतीय साहित्यातील विज्ञान-तंत्रज्ञान व साथरोग विषयक संदर्भ” या विषयावरील दोन दिवसांच्या चर्चासत्राचे (वेबिनार) उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांनी आज (बुधवार) राजभवन, मुंबई येथून केले. त्यावेळी ते बोलत होते.

कुठलीही तांत्रिक उपकरणे उपलब्ध नसताना ग्रहण कधी होणार, किती वाजता सुरू होणार, किती वेळ राहणार याची अचूक माहिती भारतीयांना हजारो वर्षांपासून होती. योगशास्त्राचा आज जगाने स्वीकार केला आहे. विश्वात अनंत ब्रम्हांड आहेत, या भारतीय सिद्धांताचा आज उलगडा होत आहे. आपले साहित्य प्राचीन ज्ञानाशी जोडतानाच भविष्याचा मार्ग प्रकाशित करते, असे यावेळी त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. ओ.पी.एस नेगी यांनी स्वागतपर भाषण केले. चर्चासत्रामध्ये अनेक विद्यापीठांच्या कुलगुरुंनी सहभाग घेतला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details