मुंबई : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याचे सामाजिक समीकरण बिघडत आहे. त्यांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी किंवा समज द्यावी अशी मागणी ( President transfer Governor out of Maharashtra ) राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे केली ( Demand President Draupadi Murmu by letter ) आहे. भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करणे व राज्यसरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे. परंतु दुर्दैवाने राज्याचे राज्यपाल नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.
राज्यपालांचा चर्चेत राहण्याचा प्रयत्न : राज्यपाल अशी वादग्रस्त विधान करत असल्याने सामाजिक समीकरण बिघडत आहेच. शिवाय ते जनतेचा रोष ओढावून घेत आहेत. मात्र राज्यपालांनी तसे करु नये असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला आहे. दरम्यान राज्यपालांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी ( Mahesh Tapase demand Governor transfer ) अशी विनंती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या पत्रात महेश तपासे यांनी केली आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल? -एका कार्यक्रमात संवाद साधताना राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी म्हटलं की, मुंबई आणि आसपासच्या शहरातून गुजराती आणि राजस्थानी माणून बाहेर काढला, तर मुंबई, ठाण्यात पैसाच राहणार नाही. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून पाहिलं जातं. पण, हे लोक गेल्यानंतर मुंबई देशाची आर्थिक राजधानीही उरणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल कोश्यारींनी केलं होते.
खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रीया : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी ( BJP should clarify its position regarding Chhatrapati ) असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. सुधांशू त्रिवेदी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे ( NCP MP Amol Kolhe on Governor Sudhanshu Trivedi ) यांनी केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी बोलताना त्यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवरायांना माफी वीर म्हणून संबोधणाऱ्या त्रिवेदी यांना महाराष्ट्राचा इतिहास आणि छत्रपतींच्या कार्याची माहिती नाही. गनिमी कावा म्हणजे नक्की काय असतं आणि गनिमी काव्याचे युद्धशास्त्र महाराजांनी कसे रुजवले याबद्दल माहिती नसलेल्या त्रिवेदी यांनी छत्रपतींचा अपमान केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.