मुंबई :राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाने नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रमांची घोषणा केलीय ०१ नोव्हेंबर 2022 पासून यांची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा हा शैक्षणिक प्रारंभ कार्यक्रम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ), कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित असणार आहेत.
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राज्य कौशल्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची होणार सुरुवात - Bhagat Singh Koshyari
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्या हस्ते राज्य कौशल्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची सुरुवात १ नोव्हेंबरपासून होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांची देखील उपस्थिती राहणार
स्वतःच्या पायावर उभे राहावे असा उद्देश :राज्यातील विद्यार्थ्यांना कौशल्ये शिकायला मिळावीत तसेच त्यानंतर जॉब देखील त्याना मिळावा त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे असा उद्देश यामागे आहे. नोबल पारितोषिक विजेते रिच रॉबर्ट्स, मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, MSSU च्या कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या डिजिटल फलकाचे अनावरण : हा कार्यक्रम मंगळवार, १ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिस्टन टेक्निकल स्कुल, पहिला मजला, मेट्रो सिनेमाजवळ, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या डिजिटल फलकाचे अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे राज्य सरकारची यासाठी असणारी भूमिका, पाठिंबा व भविष्यातील योजना तसेच कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची संपूर्ण माहिती, उद्दिष्ट, ध्येय सविस्तरपणे सांगणार आहेत.