मुंबई -महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानाचा राज्यभरातून निषेध करण्यात आला आहे.
राज्यपालांची महाराष्ट्रातून, भाजपातून हकालपट्टी करण्याची मागणी -तसेच माजी खासदार संभाजीराजे ( Former MP Sambhaji Raje ) खासदार उदयनराजे भोसले ( MP Udayanaraje Bhosale ) यांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून, भाजपातून हकालपट्टी करण्याची मागणी ( Expulsion of Governor from Maharashtra ) केली होती. मात्र, राज्यपालांवर अजूनही कोणतीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. या कारणाने आता भाजपचे खासदार असलेले उदयनराजे भोसले ( BJP MP Udayanraje Bhosale ) तसेच माजी खासदार संभाजी राजे हे आता पूर्णतः हतबल झाले आहेत.
राष्ट्रदोहाचा गुन्हा नोंदवा ?राज्यपालांनी या अगोदर सुद्धा अशा पद्धतीची वक्तव्य केलेली असून तेव्हा सुद्धा त्यांच्यावर कुठल्याच पद्धतीची कारवाई झाली नाही. परंतु आता थेट छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून त्यांचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजी राजे यांनी जरी आक्रमक पवित्रा घेतला. तरी, राज्यात केंद्रातही भाजपचं सरकार असताना सुद्धा त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने ते पूर्णतः हतबल झाले आहेत.
राष्ट्रदोहाचा गुन्हा नोंदवला -हा दिवस बघण्या अगोदर मरण आलेलं बरं, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? असा सवाल संभाजीराजे यांच्याप्रमाणे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा उपस्थित केला आहे. युगपुरुषांचा अपमान करणाऱ्यांनावर सुद्धा राष्ट्रदोहाचा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे असं परखड मत उदयनराजे यांनी मांडल आहे.
अगोदर काय म्हणाले होते उदयनराजे? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याला हटविणे, सरकारला जमत नसेल, तर त्यांची जीभ कशी हासडायची ते आम्ही बघतो, असं म्हणत राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदी यांना उदयनराजे भोसले यांनी इशारा दिला होता. तसेच भगतसिंह कोश्यारी यांना आता विस्मरण झालं असून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली पाहिजे. भगतसिंह कोश्यारींवर कारवाई केली नाही, तर मी माझ्या पद्धतीने योग्य वेळ आल्यावर जाहीर करेन, असा इशाराही उदयनराजे यांनी दिला होता.
प्रकरणावर भोसले हे पंतप्रधानांची सुद्धा भेट घेणार - परंतु त्यांच्या इशाऱ्यानंतरही अद्याप सरकारने कुठलीच कारवाई न केल्या कारणाने उदयनराजे फार नाराज झाले असून त्यांनी ३ डिसेंबर पर्यंत शांत राहण्याचे पसंत केलं आहे. या प्रकरणावर खासदार उदयनराजे भोसले हे पंतप्रधानांची सुद्धा भेट घेणार आहेत परंतु पंतप्रधानांच्या भेटीनंतर सुद्धा तरी राज्यपालांवर कारवाई होईल का? हा सुद्धा एक प्रश्नच आहे.