महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सरकारने दूध धंधा वाढविण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना करावी'

ग्राहकांना दुप्पट दराने म्हणजेच ६० रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. सध्याच्या स्थितीमध्ये ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नफा कमावला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. वाढती शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने तातडीने दूध धंदा वाढवण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना करावी, अशी मागणी महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी केली आहे.

By

Published : Jan 13, 2020, 1:18 PM IST

mumbai
प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे

मुंबई- सरकारने दूध ग्राहकांसाठी दरवाढ केली आहे. शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये भाव मिळत आहे. तर, ग्राहकांना दुप्पट दराने ६० रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. सध्याच्या स्थितीमध्ये ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नफा कमावला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. वाढती शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने तातडीने दूध धंदा वाढवण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना करावी, अशी मागणी महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे

डेरे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी गाईच्या दुधाला प्रति लिटर ४० रुपये तर, म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ५० रुपये असा दर मिळाला पाहिजे. दूध उत्पादनाचा खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. २५ रुपये प्रतिकिलोने मिळणारे पशुखाद्य आता ३० ते ३५ रुपये प्रति किलो इतके वाढले आहे. दीड रुपया प्रति किलो मिळणारा जनावरांचा चारा आता ३ रुपये ५० पैसे इतका प्रति किलो झाला आहे. त्याचबरोबर, ५०० रुपये मजुरी द्यावी लागत असून शेतकऱ्यांनी धंदा करावी की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एका पैशाचेही अनुदान मिळत नाही

शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते, अशी आजची परिस्थिती आहे. त्यासाठीच कर्जमाफीचा मोठा आर्थिक बोजा सरकारवर पडतो. महाराष्ट्र शेजारील कर्नाटक राज्य दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान देते. मात्र, कधीकाळी दूध धंद्यात नंबर एकवर असलेला महाराष्ट्र आता तिसर्‍या क्रमांकावर गेला आहे आणि एका पैशाचेही अनुदान शेतकऱ्याला मिळत नाही ही शोकांतिका असल्याचे मत दूध कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी व्यक्त केले आहे.

दूध भुकटी व बटरच्या दरात तेजी मात्र, दुधाचे खरेदीदर न वाढविता शेतकऱ्यांची लूट

राज्यात दूध भुकटी व बटरच्या दरात तेजी असूनही दुधाचे खरेदीदर न वाढविता शेतकऱ्यांची लूट चालू असल्याची टीका दूध उत्पादकांनी केली आहे. मात्र, भुकटीच्या दरातील तेजीमुळे सध्या फक्त आमचा तोटा थांबला अजून दरवाढीत योग्य नफा झालेला नाही, असा दावा महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने केलेला आहे. दूध भुकटीचे दर प्रतिकिलो १२० रुपयांपर्यंत घसरताच दूध उत्पादकांचे खरेदीदर प्रतिलिटर १८ रुपयांपर्यंत कमी करण्यात आले होते. दर कमी करणाऱ्या खासगी डेअरीचालक व सहकारी संघांना शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला होता.

सरकारच्या दुर्लक्षामुळे ग्राहक आणि शेतकऱ्यांची लूट

कल्याणकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी सरकारच्या दुर्लक्षामुळे ग्राहक आणि शेतकऱ्यांची पद्धतशीर लूट सुरू असल्याची खंत व्यक्त केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दूध संस्था शेतकऱ्यांना कमी दराने पेमेंट करत आहेत. मात्र, राज्यात इतरत्र एसएनएफ आणि फॅट्सच्या निकषाखाली लूट सुरू आहे. ३.५ फॅट्सच्या पुढे ३० पैसे न देता पॉइंटला फक्त दहा पैसे शेतकऱ्यांना मिळतात. एसएनएफमध्ये २ रुपये आणि फॅट्समध्येही अनेक भागात 2 रुपये असा 4 रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसतो.

ग्राहकांना दर्जेदार दुधाचा पुरवठा न करण्यास सरकारचे धोरण जबाबदार

आमच्याकडून ३० रुपयांनी घेतले जाणारे दूध ग्राहकांना ६० रुपयांना विकले जाते. मग ही मधली मलाई कोण खात आहे, असा सवाल श्री. डेरे यांनी उपस्थित केला आहे. राज्यात ३.२ फॅटस् व ८.३ एसएनएफच्या निकषाप्रमाणे दूध विकले जात नाही. शेतकऱ्यांची लूट आणि ग्राहकांना दर्जेदार दुधाचा पुरवठा न करण्यास शासनाचे धोरण जबाबदार आहे. त्यामुळेच, केंद्राचे निकष न पाळता टोन्ड दुधाला पाठिंबा दिला जात आहे. भेसळ रोखायची नाही ही सरकारचीच इच्छा आहे, असेही श्री. डेरे यांनी स्पष्ट केले. दुधाला भाव नाही आणि पशुखाद्य महागले. दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत. सरकी ढेपचे दर प्रतिक्विंटल १७०० रुपयांवरून २४०० रुपये, उसाचे दर प्रतिटन १७०० रुपयांवरून ३५०० रुपये झाले आहेत. धान्य भुस्सा ९५० रुपयांनी विकत घ्यावा लागत आहे. जनावरांना पाण्याची तीव्र टंचाई भासते आहे, असे गुलाबराव डेरे यांनी सांगितले.

हेही वाचा-आज के शिवाजी.. तर शिवरायांच्या वंशजांनी पदांचे राजीनामे द्यावेत

ABOUT THE AUTHOR

...view details