मुंबई - भाजप सरकारचा कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती देण्यात आलेली नाही तर मुख्यमंत्री नवीन आहेत. त्यांनी राज्यात सुरु असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेणे गरजेचे समजलेले आहे, असे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच एखाद्या प्रकल्पाचा आढावा घेण्यात काहीही गैर नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सरकारने प्रकल्प स्थगित केलेले नाही - एकनाथ शिंदे हेही वाचा -थर्डक्लास पक्षात जाऊन कारकीर्द संपवायची नाही; विश्वजीत राणेंचा सेनेवर घणाघात
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यात सुरू असलेल्या 2 लाख कोटी रुपयांच्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे. तसेच या विकासकामांचा निर्मिती खर्च हा 10 ते 20 टक्क्यांनी वाढणार असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचे खरे रूप दाखवण्याचा प्रयत्न आता सुरू केलेला आहे. आता प्रकल्पांवर लादण्यात आलेली स्थगिती ही कंत्राटदारांना कोणता इशारा करत आहे ? असा सवालही सोमय्या यांनी केला.
हेही वाचा -'मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यलय' मुंबईमध्ये स्थलांतरित झाल्याने विदर्भातील जनतेला त्रास होणार नाही - नितीन राऊत
त्याच्यावर उत्तर देताना, राज्यातील कुठल्याही प्रकल्पांना स्थगिती देण्यात आलेली नाही. मात्र, त्यांची माहिती घेण्यात आलेली आहे, असा खुलासा मंत्री शिंदे यांनी केला. तसेच यामुळे कोणत्याही प्रकल्पाचा खर्च हा वाढत नसल्याचा दावा सुद्धा शिंदे यांनी केला आहे.