मुंबई - शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आता पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे कर्मचाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले.
हेही वाचा -खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा

गेल्या १० वर्षांपासून कर्मचाऱ्यांची ही मागणी प्रलंबित असल्याचे महाराष्ट्र राज्य राजपत्रीक अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ग. दि. कुलथे यांनी सांगितले. यासाठी संघर्ष केला असून या मुद्द्यावर आतापर्यंत बैठकांवर बैठकाच होत आल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा -राष्ट्रगीताने होणार महाविद्यालयीन कामकाजाची सुरुवात, 19 फेब्रुवारी पासून अंमलबजावणी
येत्या २९ फेब्रुवारीपासून हा नवीन नियम लागू होणार आहे. यानुसार कर्मचाऱ्यांच्या दररोजच्या कामाच्या वेळेत ४५ मिनिटांची वाढ करण्यात आली आहे. महिनाभराच्या वाढीची गणना केल्यास कर्मचाऱ्यांचे दोन तास अधिक काम होणार असल्याचे कुलथे यांनी यावेळी स्पष्ट केले. शासनाच्या या निर्णयामुळे आपल्या कुटुंबासह दीर्घ सेवेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.