मुंबई - मंत्रालयातील शासकीय कर्मचाऱ्यांनी फुल आणि मुख्यमंत्र्यांचे शुभेच्छा पत्र देऊन महिलांचे स्वागत करण्यात आले. येत्या ८ मार्चला महिला दिन आहे. मात्र, मध्ये शनिवार येत असल्याने आजच महिला दिन साजरा करण्यात आला.
मंत्रालयात पुष्प आणि मुख्यमंत्र्यांचे शुभेच्छा पत्र देऊन महिलांचे स्वागत - mantralaya mumbai
मंत्रालयात नेहमी गर्दी असते. कोणाचे कोणावर लक्ष नसते. मात्र, आज मुख्यमंत्री सचिवालयाचे कर्मचारी हसतमुखाने महिलांना पुष्प आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छांचे पत्र देऊन महिलांचे स्वागत करत होते. त्यांच्यासाठी हा एक सुखद धक्का होता. त्यामुळे सर्व महिला भारावून गेल्या होत्या.

वर्षभर महिला कामानिमित्त मंत्रालयात येत असतात. मात्र, त्यांचे असे स्वागत कधीही झाले नाही. त्यामुळे या अनोख्या स्वागताने महिला भारावून गेल्या होत्या. भेटेल त्यांना मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे पत्र दाखवत होत्या. तसेच फोटोसेशन करून त्यांनी आनंद द्विगुणित केला.