महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Medical Education : वैद्यकीय अभ्यासक्रम आता मराठीत, शासनाची समिती गठीत होणार - medical course in Marathi

भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी, कायदा आणि वैद्यकशास्त्र शिकवण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या आवाहनाचा विचार राज्य शासनाने केला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम आता मराठीत. (medical course in Marathi ) शासनाची समिती गठीत (Government committee will be formed ) होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai
वैद्यकीय अभ्यासक्रम आता मराठीत, शासनाची समिती गठीत होणार

By

Published : Nov 24, 2022, 4:09 PM IST

मुंबई:भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी, कायदा आणि वैद्यकशास्त्र शिकवण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या आवाहनाचा विचार राज्य शासनाने केला आहे. त्यांची भूमिका राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या केंद्रबिंदूंपैकी एक म्हणजे उच्च शिक्षणातील भारतीय शिक्षणाशी सुसंगत असावे. केंद्र शासनाच्या भाषांच्या संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यातील एमबीबीएसचा अभ्यासक्रम आता मराठीत (medical course in Marathi ) उपलब्ध होणार. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती गठीत (Government committee will be formed ) करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.


स्थानिक भाषा शिक्षणाचे माध्यम: नवीन शिक्षण धोरणानुसार, (NEP) उच्च शैक्षणिक संस्था आणि उच्च शिक्षणातील कार्यक्रमांसाठी द्विभाषिक कार्यक्रम ऑफर करण्याव्यतिरिक्त, मातृभाषा किंवा स्थानिक भाषा शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरण्यासाठी राज्यांना सुचना केल्या आहेत. केंद्र शासनाच्या विधानामागे तर्क असा आहे की जे ९५% विद्यार्थी प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेत घेतात.उच्च शिक्षण देखील मातृभाषेत मिळायला हवे. राज्य शासनाने नवीन शिक्षण धोरणानुसार आता 7 सदस्य असलेली समिती गठीत करून मातृभाषामधून वैद्यकीय अभ्यासक्रम करायला सुरुवात केली आहे. या समितीमध्ये सात अनुभवी तज्ञ सदस्य असणार आहेत आणि एमबीबीएसच्या (MBBS) अभ्यासक्रमाबाबत मातृभाषेतून पाठ्यपुस्तक कशी असावी याबाबतचा अंतिम निर्णय समिती घेणार आहे.


याबाबत ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन इंडियाचे अमीर काझी यांना विचारले असता ते म्हणाले, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी डिसेंबर 2021 मध्ये लोकसभेत केलेले विधानांनुसार, अलिकडच्या वर्षांत अभियांत्रिकी वैद्यकीय अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलली गेली आहेत. 2021-22 पासून, AICTE ने 10 राज्यांमधील 19 अभियांत्रिकी महाविद्यालयांना सहा भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रम चालविण्यास मान्यता दिली. परिषदेने AICTE ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेकनिकल एज्युकेशन द्वारा भाषांतर सुरू केले आहे.आता राज्यात देखील मराठीत वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पुस्तक मराठीत उपलब्ध होण्यासाठी शासनाने ही समिती गठीत केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details