मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गेले सहा महिने बंद असलेले हॉटेल, रेस्टॉरंट, बार ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास ५ ऑक्टोबरपासून राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यासाठी राज्य सरकारने नियमावली व मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागल्याने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या दरम्यान सर्व व्यवहार बंद होते. राज्य सरकारने 'मिशन बिगीन' अंतर्गत व्यवहार सुरू करण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत येत्या ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट, बार ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू करताना कोरोनासंदर्भात सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आदी नियमांचे पालन करावे लागणार आहे.
हेही वाचा -'महात्मा गांधींच्या 'खेड्याकडे चला' संदेशाचे आत्मपरीक्षण करण्याची गरज'
हॉटेल, रेस्टॉरंट, बारमध्ये प्रवेश देताना शरिराचे तापमान, सर्दी, खोकला आहे का? हे तपासावे लागणार आहे. लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश द्यावा लागणार आहे. ज्यांच्या शरिराचे तापमान 38 अंश सेल्सियसच्या वर असेल अशा ग्राहकांची नोंद ठेवून त्यांना प्रवेश नाकारावा लागणार आहे. प्रति व्यक्ती 6 फुटाचे अंतर ठेवावे लागणार आहे. ग्राहकांना सेवा देताना कर्मचाऱ्यांना सुरक्षित अंतराचे पालन करावे लागणार आहे. ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवावे लागणार आहे.
देयक चुकते (बील) करताना डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास सांगावे लागणार आहे. 'रेस्टरूम', हात धुण्याची ठिकाणे वेळोवेळी स्वच्छ करावी लागणारआहेत. प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावे लागणार आहेत. कॅशियरला वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे लागणार आहेत. कर्मचाऱ्यांची वेळोवेळी कोविड तपासणी करावी लागणार आहे. एन-९५ किंवा तशापद्धतीचे मास्क वापरावे लागणार. हॉटेल, रेस्टॉरंट दिवसातून दोन वेळा स्वच्छ करावे लागणार आहेत. नियमांचे पालन केले जाते की नाही हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही लावावे लागणार आहेत.
हेही वाचा -आदित्य ठाकरे लोकप्रतिनिधींचा साधा फोनही उचलत नाहीत, आघाडी सरकारमधील नेत्याची स्पष्ट नाराजी