महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 24, 2019, 6:15 PM IST

ETV Bharat / state

मुंबईत पालिका, राज्य शासनाची रुग्णालये व्हेंटिलेटरवर

मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता मुंबई महानगरपालिका व राज्य शासनाकडून शहरात  रुग्णालये सुरू आहेत. मात्र, ही रुग्णालये स्वतःच व्हेंटिलेटरवर असल्याची बाब समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ता चेतन कोठारी

मुंबई -देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची लोकसंख्या दोन कोटींच्या जवळ जाऊन पोहचली आहे. मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता मुंबई महानगरपालिका व राज्य शासनाकडून शहरात रुग्णालये सुरू आहेत. मात्र, ही रुग्णालये स्वतःच व्हेंटिलेटरवर असल्याची बाब समोर आली आहे. माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ता चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारातून ही माहिती मिळवली.

मुंबई महानगरपालिका व राज्य शासनाची रुग्णालये स्वतःच व्हेंटिलेटरवर


मुंबईतील गोकुळदास तेजपाल रुग्णालयामध्ये एकूण १२ व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी ४ व्हेंटिलेटर सध्या कार्यान्वित नाहीत. कामा हॉस्पिटलमध्ये सुद्धा असेच चित्र आहे. या ठिकाणचे एक व्हेंटिलेटर, तर वांद्रे येथील नागरी सेवा केंद्रातील २ व्हेंटिलेटर निष्क्रिय आहेत. ही बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे.

हेही वाचा - पीएमसी बँकेच्या संदर्भात आरबीआय व अर्थ मंत्रालयाशी संपर्क सुरू आहे - किरीट सोमय्या


नादुरुस्त व्हेंटिलेटरच्या बाबतीत रुग्णालय प्रशासनाकडून संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, रुग्णालयात येणारी रुग्णांची संख्या व त्यावर उपलब्ध असलेली उपचार यंत्रणा यांचा ताळमेळ सध्या बसत नसल्याचे समोर येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details