मुंबई -गोपाळ शेट्टी हे उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार आहेत. या मतदार क्षेत्रात गुजराती लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांनी आपल्या प्रचार सभेत गाडील गुजराती होर्डिग्ज लावत प्रचार करत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराचा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी फेसबुकवर फोटो पोस्ट करत निषेध केला. महाराष्ट्रात राहून गुजराती पाट्या लावून प्रचार करत आहेत. त्यामुळे मराठी लोकांनी त्यांना मतदान करू नका, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
उत्तर मुंबईत गुजराती लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेट्टी गुजराती पाट्या लावून प्रचार करत असतील तर त्यांनी ते महाराष्ट्रात राहतात हे विसरून चालणार नाही. गोपाळ शेट्टी यांच्या या प्रचाराला मराठी समुदाय कशा प्रकारे उत्तर देत हे पाहणे योग्य ठरेल.
गोवर्धन देशमुख यांची पोस्ट -
गुजराती बॅनरचा फोटो माध्यमावर शेर करत महाराष्ट्रातील उत्तर मुंबईतून निवडणूक लढतोय. हे दृश्य गुजरातमधले नाही बरं का, प्रचार फलक बघताय ना? १०७ हुतात्म्याचे बलिदान गेले तेव्हा मराठी भाषिक मुंबईसह सयूंक्त महाराष्ट्र झाला. आणि आता हे महाराष्ट्रात तुमच्या नाकावर टिचून तुमच्या राज्यात निवडणूक लढवून जिंकून येतो. तुम्ही सुद्धा यांनाच मतदान करणार, बोलावे तरी कोणाला. इंग्रजांनी राज्य केले आता हे करतायेत आपण आपल्या मतांची ताकद कुठे वापरावी हे समजू नये इतके दुधखुळे नक्कीच नाहीत. असे देशमुख यांनी पोस्ट केली आहे.
बघा जागे व्हा, तुमच्या जीवावर निवडून येऊन तुमच्या डोक्यावर बसणारे हे लोक मराठीला फाट्यावर मारणाऱ्या या गोपाळ शेट्टीला घरी बसवा. असा मराठीचा अपमान सहन होत नाही, बाकी सर्व विसरून मराठी एकजूट कधी दिसेल. आपल्याला या विषयाचे काहीच वाटत नाही का? आम्ही यावर राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.