मुंबई - लोकसभेचा नुकताच निकाल लागला यात उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांनी ७ लाख ६ हजार ६७८ मताधिक्यांनी विजय मिळवला. यात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच विक्रमी मतांनी आघाडी घेतली.
शेट्टींनी विक्रमादित्य मतांनी मिळवली ६ विधानसभेत आघाडी
लोकसभेचा नुकताच निकाल लागला यात उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांनी ७ लाख ६ हजार ६७८ मताधिक्यांनी विजय मिळवला.
विशेष म्हणजे मालाड या एकमेव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत, तर इतर ५ मतदारसंघात भाजप-सेनेचे आमदार आहेत. मालाड-मालवणी परिसरात काँग्रेसचे प्राबल्य असताना तेथे देखील गोपाळ शेट्टी यांनी २० हजार २७ मतांनी आघाडी घेतली. या मतदारसंघात उर्मिला मातोंडकर यांनी आमदार अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सभा घेतल्या. मात्र, त्याचा फारसा परिणाम जाणवला नसल्याचे या निकालावरून जाणवले. बोरिवली विधानसभा मतदारसंघात यंदा सर्वाधिक मतदान झाले आणि हे मतदान प्रस्थापित उमेदवाराच्या विरोधात होईल असे चित्र होते. मात्र, प्रत्यक्षात गोपाळ शेट्टी यांनी ६ विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक १ लाख ५२ हजार ६११ मताधिक्य मिळवले. सहज उपलब्ध होणारा नेता, विभागातील समस्यांची जाण, मालवणीतील रखडलेले प्रश्न मार्गी लावल्यामुळे मुस्लिम मतदारांनीही शेट्टी यांना मतदान केले.
विधानसभा | उर्मिला मातोंडकर | गोपाळ शेट्टी |
बोरीवली | 34, 044 | 1,52, 611 |
दहिसर | 35,804 | 1,15,223 |
मागाठाणे | 36,417 | 1,08,286 |
कांदिवली पूर्व | 30, 462 | 1,10,419 |
चारकोप | 35,391 | 1,30,151 |
मालाड | 68,838 | 88,865 |