मुबंई- गुगलच्या डुडलची एक वेगळीच ओळख आहे. गुगल आपल्या डुडलद्वारे अनेक संदेश देत असतो. त्यांनी आता एक खास डुडल तयार केला आहे. गुगलने आपला डुडल कोरोना विरोधातील लढा देणाऱ्यांना समर्पित केले आहे. आपल्या डुडलद्वारे गुगलने कोरोनाविरोधात लढा देणाऱ्यांचे आभार मानले आहे.
'गुगल'ने 'डुडल'द्वारे मानले आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार - कोरोना बातमी
गुगलने आपल्या डुडलद्वारे आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे.
गुगलचे डुडल
जेव्हा तुम्ही गुगल सुरु कराल त्यावेळी आपणास गुगल एक वेगळ्याच पद्धतीने दिसेल. जर तुम्ही तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपवर गुगल सुरु कराल आणि कर्सर गुगलच्या चिन्हावर न्याल त्यावेळी 'टु ऑल डॉक्टर्स, नर्सेस अॅण्ड मेडिकल वर्कर्स, थँक्यू', असा संदेश दिसेल. तुम्ही जर गुगलच्या त्या डुडलला क्लिक केला तर सर्चिंगबारमध्ये 'थँक्यू कोरोना व्हायरस हेल्पर', असे दिसेल. त्याचबरोबर कोरोनाबाबतच्या विविध लिंक दिसतील.
हेही वाचा -सलून कर्मचाऱ्यांना सहायता निधी द्यावी, नाभिक समाजाची मागणी