मुंबई- कुलाबा-वांद्रे-सीपझ मेट्रो 3 प्रकल्प आरे कारशेड आणि इतर कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता. मात्र, आता हाच प्रकल्प मुंबईकरांसाठी वाहतूक सुविधेच्या दृष्टीने सर्वांत फायद्याचा आणि महत्वाचा प्रकल्प ठरला आहे. कारण आता मेट्रो 3 आणि मेट्रो 6 मार्ग एकमेकांशी जोडण्यात आल्याची घोषणा आज (दि.11 ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या घोषणेनुसार आता हे दोन मार्ग जोडले जाणार असून मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर मेट्रोने थेट एकमेकांशी जोडले जाणार आहे. म्हणजेच आता कुलाब्यावरून थेट कांजूरला जात येणार असून कुलाबा ते अंधेरी-वर्सोव्याला पोहचता येणार आहे. त्यामुळे ही मुंबईकरांसाठी मोठी उपलब्धी ठरणार असून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.
आता कुलब्यावरून थेट कांजूर अन् अंधेरी-वर्सोव्याला पोहचा, मेट्रो 3-मेट्रो 6 मार्ग एकमेकांशी जोडण्याची घोषणा - मुंबई कारशेड बातमी
कुलाबा-वांद्रे-सीपझ मेट्रो 3 प्रकल्प आरे कारशेड आणि इतर कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता. मात्र, आता हाच प्रकल्प मुंबईकरांसाठी वाहतूक सुविधेच्या दृष्टीने सर्वांत फायद्याचा आणि महत्वाचा प्रकल्प ठरला आहे. कारण आता मेट्रो 3 आणि मेट्रो 6 मार्ग एकमेकांशी जोडण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यांच्या निर्णयाचा मुंबईकरांनी स्वागत केला आहे.
मेट्रो 3 साठी आरेत तर मेट्रो 6 साठी कांजूरला कारशेड बांधण्यात येत होता. पण, आता मात्र या दोन्ही मेट्रो मार्गासाठी एकच कारशेड असणार आहे. त्यामुळे आधी दोन कारशेड, त्यासाठी दोन्ही कारशेड मिळून 60 हेक्टर जागा लागणार होती. तिथे आता एकाच ठिकाणी 30 ते 40 हेक्टरमध्ये काम होणार आहे. म्हणजेच जागाही वाचणार तर एकच कारशेड बांधण्यात येणार असल्याने पैसेही वाचणार असल्याचा दावा स्टॅलिन यांनी केला आहे.
हेही वाचा -टीआरपी घोटाळा : 'या' आरोपीच्या बँक खात्यात आले होते 1 कोटी