महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुर्ल्यात सराईत सोनसाखळी चोर महिला अटक; 33 तोळे दागिने हस्तगत

कुर्ला रेल्वे स्थानकात गेल्या महिन्यात 30 तारखेला रेल्वे प्रवासात एका महिलेची फलाट क्रमांक 4 वरून गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेली होती. यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कुर्ल्यात सराईत सोनसाखळी चोर महिला अटक

By

Published : Oct 12, 2019, 4:39 PM IST

मुंबई- गेल्या महिन्यात कुर्ला रेल्वे स्थानक येथे एक सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरा तपासला. यात रेल्वे प्रवासातील सराईत सोनसाखळी चोर महिला आढळल्याने अधिक तपास करून या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या महिलेकडून 33 तोळ्यांचे दागिने हस्तगत करण्यात आले.

कुर्ल्यात सराईत सोनसाखळी चोर महिला अटक

हेही वाचा-पीएमसी बँकेतील घोटाळ्यानंतर आरबीआयने व्यवस्थेत 'हा' केला बदल

कुर्ला रेल्वे स्थानकात गेल्या महिन्यात 30 तारखेला रेल्वे प्रवासात एका महिलेची फलाट क्रमांक 4 वरून गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेली होती. याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन कुर्ला रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर फलाट क्रमांक 4 वरील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले. यादरम्यान, रेकॉर्डवरील संशयित सोनसाखळी चोर महिला दिसल्यानंतर कुर्ला रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी एक पथक नेमून या महिलेच्या गोवंडी येथील घराबाहेर सापळा रचला. यात महिलेस सदरील गुन्ह्या प्रकरणी ताब्यात घेत अटक केली. यानंतर या महिलेला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मंजूर करून घेतली.

हेही वाचा-'भाजप-सेनेचे राजकारण जाती-धर्माच्या नावाने जनतेत दुफळी निर्माण करणारे'

या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे महिलेने कबुली दिली. त्यानंतर तिची इतर गुन्ह्ये संदर्भात अधिक चौकशी केली. यात कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे 10 गुन्हे केल्याचे महिलेने कबूल केले. या महिलेच्या घराची पंचा समक्ष पोलिसांनी झडती घेतली. महिलेने दिलेल्या निवेदनानुसार 45 ग्रॅम 900 मिलिग्रॅम व 248 ग्रॅम व 900 मिलिग्रॅम असे एकूण 249 ग्राम 889 मिलिग्रॅम दागिने हस्तगत करण्यात आले. या दागिन्याचे बाजारमूल्य 8 लाखाच्या पुढे आहे. पुढील तपास कुर्ला लोहमार्ग पोलीस करीत आहेत

ABOUT THE AUTHOR

...view details