मुंबईGold Smuggling Case Mumbai:पहिल्या ठिकाणी कायदेशीर खरेदीचा कोणताही पुरावा नसताना विदेशी स्टॅम्प असलेली 1 किलो सोन्याची पट्टी जप्त करण्यात आली. पहिल्या ठिकाणी केलेल्या कारवाईतून मिळालेल्या माहितीनंतर, दुसऱ्या ठिकाणी शोध घेण्यात आला. या कारवाईत आणखी 7.022 किलो सोने आणि 1 कोटी 22 लाख 10 हजार भारतीय चलनातील (तस्करीच्या सोन्याच्या विक्रीतून मिळालेली रक्कम) रक्कम जप्त करण्यात आली आहे. या सिंडिकेटशी संबंधित 4 ठिकाणी पुढील शोध घेण्यात आला असून त्यापैकी एका सोने वितळवून तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
विदेशी स्टॅम्प असलेले सोने जप्त:अशा प्रकारे, दोन्ही कारवाईत एकूण 8.022 किलो सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ४ कोटी ७८ लाख ७४ हजार ५४७ आणि भारतीय चलनातील १ कोटी 22 लाख 10 हजार रुपयांच्या (तस्करी केलेल्या सोन्याच्या विक्रीतून मिळालेली रक्कम) नोटा जप्त करण्यात आल्या. एका ठिकाणी केलेल्या कारवाईच्या ठिकाणी सापडलेला व्यवस्थापकाच्या ताब्यातून तस्करी केलेले विदेशी स्टॅम्प असलेले सोने जप्त करण्यात आले होते. त्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे आणि त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सिंडिकेटमधील इतर सदस्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी डीआरआय पुढील तपास करत आहे. सोन्याच्या तस्करीमुळे देशाच्या आर्थिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे अशी माहिती DRI च्या सूत्रांनी दिली आहे.