महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gold Smuggling : DRI ची मोठी कारवाई; मुंबईसह वाराणसी, नागपूर येथून 19 कोटींचं सोनं जप्त - कोट्यवधींचे सोने जप्त

Gold Smuggling : DRI ने संपूर्ण भारतातील कारवाईत सोन्याची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) वारणासी, नागपूर आणि मुंबईत कारवाई करून 31.7 किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत 19 कोटी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाई दरम्यान एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

Gold Smuggling
19 कोटींचे सोने केले जप्त

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 3:45 PM IST

मुंबई Gold Smuggling :बांगलादेश बॉर्डरवरून भारतात तसेच मुंबई, नागपूर आणि वाराणसी येथे सोन्याची तस्करी करणाऱ्या मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात 'डीआरआय'ला यश आले आहे. विशिष्ट गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करून, डीआरआयने रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्गाद्वारे परदेशातून सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या सिंडिकेटचा छडा लावला. तीन ठिकाणी डीआरआयच्या टीमने कारवाई केली आहे. यात काळजीपूर्वक नियोजित आणि सुव्यवस्थित ऑपरेशनमध्ये, सुमारे 31.7 किलो वजनाचे तस्करी केलेले सोने 13 आणि 14 ऑक्टोबर दरम्यान जप्त केले आहे.

2 तस्करांना रेल्वे स्थानकावर पकडले :जप्त केलेल्या सोन्याची किंमत 19 कोटी असून ही कारवाई वाराणसी, नागपूर आणि मुंबई येथे करण्यात आली. कोलकाता येथून निघालेल्या ट्रेनमधून नागपूर रेल्वे स्थानकावर उतरताना नागपूर पथकाने सोन्याच्या दोन वाहकांना पकडले. त्यांच्याकडून 8.5 किलो विदेशी चिन्हांकित (छिक्का) असलेले सोने जप्त करण्यात आले. त्यांच्या चौकशीतून तस्करीच्या सोन्याचे दोन रिसिव्हर्सही ओळखून त्यांना पकडण्यात आले.


वाराणसी टीमची जंगलात शोधमोहीम :वाराणसी टीमने 3 तासांच्या नाट्यमय पाठलागानंतर आणि जंगलात शोध मोहिमेनंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेशमध्ये प्रवास करत असताना दोन आरोपींना कारसह पकडले. दोन व्यक्तींकडून कारच्या हँड ब्रेकच्या खाली बनवलेल्या पोकळीतून सुमारे 18.2 किलो सोने जप्त करण्यात आले.

मुंबईच्या रस्त्यावर पाच सोने तस्करांना अटक :वाराणसीहून रेल्वेने सोने घेऊन निघालेल्या ५ आरोपींना मुंबईच्या रस्त्यांवर शोध घेऊन पकडण्यास मुंबई टीमला यश आले. त्यांच्याकडून ४.९ किलो सोने जप्त करण्यात आले. या सिंडिकेटने बांगलादेशच्या सीमेवरून भारतात आणलेल्या सोन्याची तस्करी केली आणि पुढे ते मुंबई, नागपूर, वाराणसीकडे वळवले. एकूण 11 जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी मुंबईत २, वाराणसीत २ आणि नागपुरात ४ जणांना अटक करण्यात आली.

यापूर्वीही झाली होती मोठी कारवाई: डीआरआयने यापूर्वी फेब्रुवारी, 2023 मध्ये सोने तस्करांविरुद्ध बिहार, महाराष्ट्रात मोठी कारवाई केली होती. ऑपरेशन गोल्ड डॉन पॅन इंडिया अंतर्गत त्यावेळी 10 तस्करांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी पाटणा जंक्शन येथून 3 सुदानी तस्करांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या तस्करांकडून 101.7 किलो सोन्याची पेस्ट आणि चलन जप्त करण्यात आले होते. डीआरआयने पाटणा, मुंबई आणि पुणे येथे कारवाई केली होती.

भारत-नेपाळ सीमेवरून सोन्याची तस्करी: ऑपरेशन गोल्ड डॉन पॅन इंडिया अंतर्गत महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या कारवाईत मोठा खुलासा झाला होता. पाटणा, पुणे, मुंबई येथे ही कारवाई करण्यात आली. सोने तस्कर भारत-नेपाळ सीमेवरून पाटण्याला येत असत. नंतर विमान तसेच रेल्वेच्या माध्यमातून तस्करी करण्यात येत होती. या प्रकरणी पाटण्यात ३७ किलो सोन्याच्या पेस्टसह ३ सुदानी नागरिकांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

हेही वाचा:

  1. Eight Crores Gold Seized : अबब...! मुंबईहून तस्करी होणारे आठ कोटी रुपयांचं सोनं जप्त, दोन तस्करांची चौकशी सुरू
  2. Gold Smuggling Cases : देशात सोन्याच्या तस्करीत 33 टक्क्यांची वाढ; मुंबई विमानतळावर एकूण १४४ किलो सोने जप्त
  3. Gold Smuggling Case Mumbai: सोन्याची पेस्ट करून तस्करी करण्याचा नवा फंडा, मुंबई विमानतळावर गेल्या वर्षभरात ६०० किलो सोने जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details