मुंबई: ३० वर्षीय इंतिझार हा उत्तर प्रदेशातील रामपूरचा रहिवासी आहे. त्याला सीमाशुल्क अधीक्षक वेणुगोपालन यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळवर पकडले. विशिष्ट माहितीच्या आधारे, AIU, कस्टम्स, मुंबईद्वारे CSMI विमानतळावर या प्रवाशाला काही प्रतिबंधित वस्तू लपविण्याच्या संशयावरून अटक करण्यात आली. यानंतर त्याला अस्वस्थता वाटत होती. सतत चौकशी केल्यावर प्रवाशाने कबूल केले की, त्याने काही प्रतिबंधित पदार्थ म्हणजे सोने खाल्लेले आहे.
तीन दिवसांपासून सोने पोटात:डॉ. अजय भंडारवार यांच्या अधिपत्याखाली सोने तस्करावर उपचार करण्यात आले. 'रेडिओलॉजिकल रिपोर्ट'मध्ये प्रवाशाच्या आतड्यात अनेक धातूच्या वस्तू असल्याचे दिसून आले. ही एक वेगळी घटना होती; कारण रुग्ण आतड्यात सोन्याच्या छोट्या पट्ट्या घेऊन जात होता. ज्या 3 दिवसांपासून अडकल्या होत्या. अशा प्रकरणांमध्ये प्रवाशाला आतड्यांसंबंधी अडथळे निर्माण होऊ शकतात. शस्त्रक्रिया करता येत नाही. तस्कराने सोन्याचे सात तुकडे प्लास्टिकचे वेष्टन लावत गिळले होते.