मुंबई : आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. काल मंगळवारी जिथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,330 रुपये होता. आज, बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,360 वर पोहचला आहे. 22 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे झाले तर, 22 कॅरेट सोन्याचा आदल्या दिवशीचा भाव 55,300 रुपये होता. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,250 रुपये आहे.
सोने-चांदी महाग : सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही काळापासून दररोज चढ-उतार होत आहेत. आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव 61 हजार 400 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात आज 3,200 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरात एकाच दिवसात 2 हजार 490 रुपयांनी वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 77 हजार 90 रुपये आहे. दुसरीकडे, आदल्या दिवशी चांदीचा भाव 74 हजार 600 रुपये होता.
सोन्याने नवा उच्चांक गाठला : महावीर जयंतीनिमित्त मंगळवारी एक्स्चेंजमध्ये सकाळचे व्यवहार झाले नाहीत, मात्र सायंकाळी एक्सचेंज उघडल्यावर सोन्याने नवा विक्रम नोंदवला. या नवीन विक्रमानंतर सोन्याचा भाव मंगळवारी 60 हजार 954 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. त्यामुळे आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी आली आहे.