मुंबई :गोखले पूल 1975 मध्ये बांधण्यात आला होता. 2019 मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यात सल्लागाराने गोखले पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला दिला होता. त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीतील पुलाचे काम सुरू केले. मात्र, रेल्वे हद्दीतील गोखले उड्डाणपूल धोकादायक असल्याने रेल्वे हद्दीतील उड्डाणपूल (Gokhale flyover demolish from today) पाडून नवा बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तशा सुचना याअगोदर प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्या अनुशंगाने हे काम होत आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर चार दिवस मेगाब्लॉक :7 नोव्हेंबर 2022 पासून हा उड्डाणपूल बंद करण्यात आलेला आहे. आता हा उड्डाणपूल पश्चिम रेल्वेकडून पाडण्यात येणार आहे. त्यामुळे मेगाब्लॉक (megablock on Western Railway line) 10, 11, 12, 13 आणि 14 जानेवारी रोजी मध्य रात्री 12.45 ते पहाटे 4.45 वाजेपर्यंत आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. या ब्लॉगमुळे पश्चिम रेल्वे वरील काही लोकल ट्रेन यांच्या वेळापत्रकामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेले काम आता पुर्ण होत असल्याने नागरिकांनी याबाबात समाधान व्यक्त केले आहे.