मुंबई :अंधेरी येथीलगोखले पूल ( Andheri Gokhale bridge ) बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अंधेरी परिसरात वाहतूक कोंडी होणार आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून अंधेरी पश्चिम पूर्व आणि पश्चिम परिसरात जाण्यासाठी वेगवेगळ्या 5 मार्ग वापरण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून आवाहन नागरिकांना करण्यात आला आहे. गोखले पुल बंद ( Andheri Gokhale bridge ) केल्याने पहिल्याच दिवशी नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. त्यामुळे या पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू व्हावे, यासाठी स्थानिक पातळीवर मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेनेही पुलाचे काम वेगाने सुरू करण्यासाठी तयारी केली आहे. पुल तातडीने पाडण्याचे काम पालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. तर रेल्वेच्या अखत्यारीतील कामदेखील पालिकेक़डूनच केले जाणार आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये अंधेरीच्या गोखले पुलाच्या एका लेनवरून वाहतूक सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू (Additional Commissioner P Velarasu ) यांनी दिली.
वाहतूक दुसऱ्या मार्गाने - सकाळपासून गोखले पूल बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अंधेरी परिसरात वाहतूक कोंडी होणार आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून अंधेरी पश्चिम पूर्व आणि पश्चिम परिसरात जाण्यासाठी वेगवेगळ्या 5 मार्ग वापरण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून आवाहन नागरिकांना करण्यात आला आहे.
रेल्वेच्या हद्दीतील बांधकामही पालिका करणार - अंधेरी येथील गोखले पुलावर पूल ३ जुलै २०१८ रोजी कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. गोखले पुलाचे ‘एससीजी कन्सलटन्सी सर्व्हिस कंपनी’कडून ऑक्टोबरमध्ये ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले. १९७५ मध्ये बांधण्यात आलेल्या या पुलाला भेगा पडल्याने तो धोकादायक बनला असल्याने पाडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे हा पूल आज पासून रहदारी आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबई आयआयटीकडे गोखले ब्रीजच्या कामासाठीचे डिझाईन मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. या डिझाईनला आयआयटीने मंजुरी दिल्यानंतर त्यानुसार ब्रीजच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया सुरू होईल. या ब्रीजवर सुरूवातीला पालिकेच्या अखत्यारीतील २६५ मीटर अंतरामध्ये तोडकाम करण्यात येईल. त्यानंतर रेल्वेच्या अखत्यारीतील कामासाठी रेल्वेच्या मदतीने याठिकाणच्या कामाला सुरूवात होणार आहे. रेल्वेने पालिककेडे केलेल्या विनंतीनुसार रेल्वेच्या अखत्यारीतील बांधकामही पालिका करणार आहे. त्यामुळे या ९० मीटरच्या अतिरिक्त कामासाठी पालिका निविदा प्रक्रिया राबवणार आहे. पुढच्या महिन्याभरात ही निविदा प्रक्रिया सुरू होईल, अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी सांगितले.