महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Unique Punishment: पाच तरुणांना वृद्धाश्रमात जाऊन सहा महिने सेवा करण्याची शिक्षा - ऑनलाईन गेमिंग

ऑनलाईन गेमिंगमधील (Online gaming) गुंतवणुकीच्या संदर्भात खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या पाच तरुणांना उच्च न्यायालयाने सहा महिने वृद्धाश्रमात जाऊन सेवा करण्याची (Go to old age home and serve for six months) अनोखी शिक्षा (Unique punishment) सुनावली आहे. याप्रकरणी दाखल फौजदारी खटल्यामुळे नोकरी मिळण्यास अडचणी येत असल्यामुळे हा गुन्हा रद्द करावा अशी मागणी या तरूणांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court ) याचिकेद्वारे केली होती.

Mumbai High Court
मुंबई उच्च न्यायालय

By

Published : Feb 22, 2022, 2:58 PM IST

मुंबई:गुंतवणुकीच्या संदर्भात खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपा नंतर नोकरी गेली आणि गुन्हा नोंद असल्यांने नवी नोकरीही मिळत नाही. त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी पाचही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अनिल किल्लोर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

तक्रारदाराच्या सहमतीने हे प्रकरण परस्पर मिटविण्यात आले असून दाखल गुन्हा रद्द झाल्यास तक्रारदारालाही हरकत नाही असेही पोलिसांच्यावतीने उच्च न्यायालयात सांगण्यात आले. मात्र गुन्हा रद्द करताना केलेल्या गुन्हाची अद्दल घडावी, म्हणून हायकोर्टाने पाचही आरोपींना पुढचे सहा महिने पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पुण्यातील 'निवार' वृद्धाश्रमात काम करण्याची शिक्षा सुनावली.

तसेच सहा महिन्यांनी तिथे काम केल्याचे प्रमाणपत्र न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. तसेच या पाच जणांनी ऑनलाइन गेमिंगमधील मोठ्या नफ्याच्या हव्यासापोटी पैसे पुरविणाऱ्या तक्रारदार मित्रालाही त्यांच्यासोबत तिथे सेवा करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असलेल्या पाच तरूणांनी आपल्या ओळखीच्याच एका व्यक्तीला ऑनलाइन गेमिंगमध्ये मोठा नफा कमावून देण्याच्या नावाखाली पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले होते. त्या तरूणाने त्यांच्यावर विश्वास ठेवत पैसेही गुंतवले. मात्र, त्याने नंतर आपले पैसे परत मागितले असता आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि वर त्याच्याकडे आणखीन पैसे मागितले. यामुळे व्यथित होऊन तरुणाने 6 एप्रिल 2021 रोजी पुण्यातील वानवडी पोलीस स्थानकांत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी पाच आरोपींविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा :Gangubai Kathiawadi Movie : गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा वाद मुंबई उच्च न्यायालयात; उद्या सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details