मुंबई -जीवघेण्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. हा विषाणू आतापर्यंत 120 पेक्षा अधिक देशात पोहोचला आहे. भारतातही कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत तर महाराष्ट्रात आता 37 रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभाग या रोगापासून बचाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एकीकडे हे सर्व सुरू असतानाच, दुसरीकडे नेटकरी आणि कलाकार कोरोनावरून वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. कोरोनावरून विनोदी किस्से आणि गाणी मोठ्या प्रमाण समाज माध्यमावर खूप व्हायरल होत आहे.
'गो कोरोनो'च्या मिम्ससह रिमिक्स गाणे समाज माध्यमावर तुफान व्हायरल - गो कोरोनो मिम्स
कोरोनो रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, तो रोखण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि काही भिक्खू यांनी मुंबईत प्रार्थना केली होती. याचा व्हिडिओही समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आठवलेंना प्रचंड ट्रोल केले गेले.
हेही वाचा -CORONA : तर घरातच विलगिकरण करण्यात आलेल्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांची मदत
कोरोनो रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, तो रोखण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि काही भिक्खू यांनी मुंबईत प्रार्थना केली होती. याचा व्हिडिओही समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये मुंबई येथील चिनी महावाणीज्य दूत गुओकाई आणि बाैध भिक्खू यांच्या समवेत, एका प्रार्थना सभेत 'गो कोरोना, गो कोरोना' अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यानंतर रामदास आठवले प्रचंड ट्रोल केले गेले.
गो कोरोनो गो याबद्दल खिल्ली उडवणारे मेसेजेस फेसबुक, ट्विटर ,इन्स्टाग्रामवर फिरत आहेत तसेच 'गो कोरोना गो' असे बोल असलेले हे गाणे देखील व्हायरल होत आहे. या गाण्याला रिमिक्स केले असून, त्यामधून कोरोनाला परत जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शिवाय त्यामध्ये सध्या फोनसाठी सुरू असलेली डायलरट्यूनचाही समावेश करण्यात आला आहे.