महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्याला 'वाय' सुरक्षा देणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान- गृहमंत्री देशमुख - anil deshmukh comment on kangna ranaut

मुंबई किंवा महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला केंद्र सरकार 'वाय' सुरक्षा देत असेल तर, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे गृहमंत्री म्हणाले.

प्रतिक्रिया देताना गृहमंत्री अनिल देशमुख
प्रतिक्रिया देताना गृहमंत्री अनिल देशमुख

By

Published : Sep 7, 2020, 4:34 PM IST

मुंबई- मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात राहता येणार नाही, असा सज्जड इशारा देणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना राणौतवर टीका केली आहे.

प्रतिक्रिया देताना गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई किंवा महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला केंद्र सरकार 'वाय' सुरक्षा देत असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. सर्व पक्षांनी याचा निषेध केला पाहिजे, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

हेही वाचा-जनतेचा उद्रेक होण्याआधी मागण्या मान्य करा; राज ठाकरेंचा अदानी कंपनीच्या सीइओंना इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details