महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 25, 2021, 10:01 AM IST

Updated : Jul 25, 2021, 11:19 AM IST

ETV Bharat / state

'कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून द्या'

या आंदोलनात विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार सुनील राणे, आमदार मनीषा चौधरी यावेळी उपस्थित होते. यावेळी रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले होते.

given railway service to those who taken corona vaccine both doses
'कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून द्या'

मुंबई - कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी भाजपच्या वतीने बोरिवली रेल्वे स्थानक याठिकाणी आंदोलन करण्यात आले.

माध्यमांशी बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

कोरोनाकाळा अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्यवसायही बंद आहेत. नागरिक कर्जबाजारी झाले आहेत. कोरोनाकाळात नागरिकांनी खूप काही सहन केले आहे. भारतीय जनता पक्षाला जनतेची काळजी आहे. यामुळे ज्यांच्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत, रेल्वे प्रवास करायला परवानगी द्यावी, असे मागणी विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

स्वाक्षरी अभियान -

या आंदोलनात आमदार सुनील राणे, आमदार मनीषा चौधरी यावेळी उपस्थित होते. यावेळी रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले होते. तर सरकारने मागणी मान्य केली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येणार आहे, असे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

हेही वाचा -

Last Updated : Jul 25, 2021, 11:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details