मुंबई - शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी पत्र दिले आहे.
विधीमंडळाच्या रिक्त जागांसाठी निवडणूक घ्या, शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे राज्यपालांना पत्र - शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे राज्यपालांना पत्र
शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी पत्र दिले.

हेच पत्र केंद्रीय निवडणूक आयोगालाही देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कालावधी 24 एप्रिल रोजी संपला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच या रिक्त झालेल्या 9 सदस्यांच्या जागी नवीन सदस्य निवडून आणण्यासाठी निवडणुका होणार होत्या. मात्र, कोविड-19 चा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली होती. आता राज्य सरकारकडून ही निवडणूक पुन्हा घ्यावी, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्यपाल यांना शिवसेनेकडून पत्र देण्यात आले आहे.