मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांवर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यासह देशात त्याचे पडसाद उमटत आहेत. भाजपने ठाकरे गटाला यावरून टार्गेट केलं आहे. गेल्या आठ वर्षांत भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Freedom fighter Sawarkar) नावाने राजकारण केले. सत्ता आणि अधिकार असतानासूध्दा त्यांना अद्याप भारतरत्न (Bharatratna) जाहीर झालेला नाही. त्यामुळे लोकांना उत्तर देण्यापेक्षा, कामातून प्रत्युत्तर द्या, असा चिमटा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी भाजपला काढला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त गोऱ्हे यांनी शिवतीर्थावर जाऊन अभिवादन केले. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी आणि विचार देशाला कायमचं मार्गदर्शक राहतील, असे त्या म्हणाल्या.
Neelam Gorhe: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, नीलम गोऱ्हेंची मागणी - Bharatratna
गेल्या आठ वर्षांत भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Freedom fighter Sawarkar) नावाने राजकारण केले. सत्ता आणि अधिकार असतानासूध्दा त्यांना अद्याप भारतरत्न (Bharatratna) जाहीर झालेला नाही. त्यामुळे लोकांना उत्तर देण्यापेक्षा, कामातून प्रत्युत्तर द्या, असा चिमटा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी भाजपला काढला.
बाळासाहेबांच्या आठवणी आणि विचार देशाला दिशा देणारे -गोऱ्हेहिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज शिवाजी पार्क येथे शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. यावेळी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, राज्य शासनाच्या महापुरुषांच्या यादीमध्ये बाळासाहेबांचे नाव समाविष्ट करण्याकरिता शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना प्रयत्न केले होते. महाविकास आघाडी सरकार असताना त्याबाबत योग्य निर्णय झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी आणि विचार देशाला कायमच मार्गदर्शक राहतील, असे त्यांनी सांगितले.
सावरकरांना भारतरत्न द्या -गोऱ्हेस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Freedom fighter Sawarkar) यांना भारतरत्न (Bharatratna) प्रदान करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जोरकसपणे केली आहे. स्वातंत्र्यवीरांच्या कार्यावर आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या अनमोल त्यागासाठी त्यांना भारतरत्न किताबाने यापूर्वीच सन्मानित करणे अपेक्षित होते. असे गोऱ्हे म्हणाल्या.