मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी सुरळीत पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा पीक कर्जाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
राज्य सरकारला ५ वर्षे होत आली आहेत. मात्र, हे सरकार सपशेल फेल ठरले आहे. सरकारच्या विविध योजनांचा बोजवारा उडाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांबाबत निवेदन सादर केले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.