महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime: अजबच! दोघांचा झाला प्रेमविवाह; मुलीकडच्या नातेवाईकानेच जावयाच्या बोटांचा घेतला चावा - पोलिस

प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीकडच्या नातेवाईकानेच जावयाच्या हाताच्या बोटांचा चावा घेतल्याची घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Mumbai Crime
बोटांचा चावा घेतला

By

Published : Feb 22, 2023, 4:32 PM IST

मुंबई: प्रेम विवाह केल्यामुळे अनेक तक्रारींच्या घटना घडलेल्या आपण ऐकल्या असतील. बऱ्याच घटनांमध्ये मुलीचा मानसिक छळ देखील केला जातो. मात्र या घटनेत जावयालाच नाहक त्रास देऊन मुलीच्या नातेवाईकांनी हाताला चावून दुखापत केली आहे. याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण: मालाड येथील कुरार व्हिलेज परिसरातील माऊली प्राइड या इमारतीत राहणाऱ्या तक्रारदार मालाराम मोतीराम चौधरी (29) हे त्यांची पत्नी जोशना आणि मुलांसह राहतात. त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. ऑगस्ट 2021 मध्ये त्यांनी जोत्स्ना हिच्याशी प्रेमविवाह केला. या प्रेमविवाहास मुलीचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांचा विरोध होता. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी मालारामला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या.

हाताचा घेतला चावा: जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यानंतर मालाराम यांनी राजस्थानमध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती. ज्योत्स्नाचा एक नातेवाईक राजाराम चौधरी हा देखील कुरार विलेज परिसरात राहतो. 20 फेब्रुवारीला रात्री सव्वा नऊच्या सुमारास मालाराम आणि त्यांचे कुटुंबीय आणि मित्र अविनाश यांच्यासह बाजारामध्ये खरेदीसाठी गेले होते. त्यानंतर ते जैन मंदिर रोडवर दुकानाजवळ पोहोचले तेव्हा आला आणि त्याने तक्रारदार असलेल्या मालाराम चौधरीला शिवीगाळ करायला सुरुवात केली. मालारामने विरोध करताच आरोपी असलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मालारामच्या डाव्या हाताच्या बोटांना कडकडून चावा घेतला.


जीवे मारण्याची धमकी: मुलीने मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून जावयालाच कडकडून चावल्याची ही घटना मालाडच्या कुराळ विलेज परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी असलेल्या राजारामने मोतीरामला बेदम मारहाण केली. त्याचप्रमाणे त्यावेळी तुझी बायको सोबत होती म्हणून वाचलास नाहीतर मेला असतास अशी धमकी नातेवाईकांनी दिली. मात्र पुढच्या वेळी तुला सोडणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी मोतीरामला देण्यात आली असल्याची माहिती कुरार पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी कारवाई करावी: प्रेमविवाहला विरोध केला जात असल्यामुळे अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात गुन्हेगारींच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारीला आडा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊले उचलली पाहिजेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


हेही वाचा:Stray Dogs Attack In Hyderabad : हैदराबादमध्ये आणखी एका मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details