गिरीष चौधरी यांची आज तुरुंगातून सुटका मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांची आज तुरुगांतून सुटका करण्यात आली आहे. परवा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आज गिरीष चौधरी यांना एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. थोड्यावेळापूर्वीच चौधरी यांची ऑर्थररोड तुरुगांतून सुटका करण्यात आली आहे.
20 महिने गिरीष चौधरी तुरूंगात :भाजपाचे तत्काली तत्कालीन नेते तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुण्यातील भोसरी जमीन व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्या संदर्भात त्यांची चौकशी सुरू आहे. परंतू जावई गिरीष चौधरी यांनी देखील त्यांना त्यात मदत केल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणात 20 महिने गिरीष चौधरी तुरूंगात होते. त्यामुळेच गिरीष चौधरी यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु तो फेटाळला गेल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने परवा गिरीष चौधरी यांच्या जामीन अर्जावर सुनावणी केली. त्यावेळी त्यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पी.एम.एल. ए न्यायालयाला प्राप्त झाला होता. त्यानुसार चौधरी यांची वैयक्तिक 1 लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे.
आज सांयकाळी तुरुगांतून सुटका :एकनाथ खडसे यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर करून पुण्यातील भोसरी जमीन खरेदीत आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याबाबतची चौकशी देखील सुरू आहे. परंतु पुणे येथील एसीबीकडून त्याबाबत क्लोजर रिपोर्ट सादर झाल्यानंतर चौकशी बंद झाली होती. परंतु 2022 मध्ये सत्तांतर घडले. खडसे यांची तसेच त्यांचे जावई यांची देखील पुन्हा चौकशी सुरू सुरू झाली. त्यानंतर जावई गिरीष चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना परवाच जामीन मंजूर केला. त्या संदर्भात आज तो आदेश पी.एम.एल. ए न्यायालयाला प्राप्त झाला. त्यानंतर गिरीष चौधरी यांची आज सांयकाळी तुरुगांतून सुटका झाली.
अटीशर्तीसह गिरीष चौधरी यांना जामीन मंजूर : माझी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी हे 20 महिन्यांपासून पोलीस कोठडीमध्ये होते. त्यामुळे त्यांची जामीन मिळवण्यासाठी धडपड सुरु होती. तसेच 30 मे पासून त्यांच्या किडनी आजारावर, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना गंभीर आजार असल्याचे वैद्यकीय कारण देखील सर्वोच्च न्यायालयात दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज त्यांच्या संदर्भात विशेष पी.एम.एल. ए न्यायालयाचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्याकडे सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने काही अटीशर्तीसह गिरीष चौधरी यांना जामीन मंजूर केला.
हेही वाचा -Girish Chaudhary : एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची आज होणार तुरुंगातून सुटका