मुंबई : अलीकडे गुजरात, मध्य प्रदेश आणि नागपूरमध्ये एनआयएने ‘गझवा-ए-हिंद'प्रकरणी केलेल्या छापेमारीनंतर खळबळ उडाली आहे. संपूर्ण देशात दहशतवाद पसरवण्यासाठी आयएसआय, लष्कर ए तोयबा आणि इसिससारख्या दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. या सर्व दहशतवादी संघटनांचे उगम स्थान हे पाकिस्तान असून आता गझवा-ए-हिंद ही दहशतवादी संघटना नावारूपाला आली आहे. या दहशतवादी संघटनेचे उद्दिष्ट हे संपूर्ण हिंदुस्तान इस्लामिक देश बनवण्यासाठी विकारी विचार पसरवणे हा आहे. याबाबत जेष्ठ पत्रकार विवेक अग्रवाल यांनी माहिती दिली आहे.
गजवा-ए-हिंद दहशतवादी संघटना : ‘गजवा-ए-हिंद’च्या मॉड्युलचा उपयोग करून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील नागपुरात विखारी विचारांचे ‘स्लीपर सेल’ तयार करण्यावर भर होता, असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. गजवा-ए-हिंद हे इसिसने जन्माला घातलेले नवे दहशतवादी अपत्य असून अबू बकर अल बगदादी हा ‘गजवा-ए-हिंद’ या दहशतवादी संघटनेचा मोरक्या होता. अमेरिकेने त्याचा खात्मा केला. उपकार अल बगदादी याच्या नेतृत्वाखाली इराक आणि सिरिया मधून ‘गजवा-ए-हिंद’ दहशतवादी संघटना चालवली जात होती. 2006 पासून या संघटनेची सुरुवात झाली. ऑनलाइन पद्धतीने तरुणांना या संघटित सामील होण्यासाठी माथी भडकवली जातात. नंतर ऑनलाईन पद्धतीनेच आयडी बॉम्ब बनवणे यासारखे दहशतवादी प्रशिक्षण दिले जाते.
गझवा ए हिंद म्हणजे काय? :वास्तविक, धर्मांध विचारसरणीचे पालन करणाऱ्या दहशतवाद्यांचे गझवा-ए-हिंदचे स्वप्न आहे. गझवा-ए-हिंदच्या अर्थाबद्दल बोलताना असे म्हटले जाते की, एक दिवस भारतासोबत अंतिम युद्ध होईल आणि या युद्धात हिंद म्हणजेच हिंदुस्थानाचा पराभव होईल आणि या युद्धालाच गझवा-ए-हिंद असे नाव देण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार विवेक अगरवाल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, गझवा-ए-हिंदचा उपयोग भारताच्या शेवटच्या लढाईसाठी केला जातो. अशा प्रकारे, ढोबळमानाने, गझवा-ए-हिंद म्हणजे युद्धाद्वारे भारतात इस्लामिक राज्याची स्थापना असे म्हटले जाते. इस्लामची स्थापना म्हणजे केवळ इस्लामिक सरकारची स्थापना करणे नव्हे तर इस्लामचा विस्तार देखील आहे, असे पुढे अगरवाल यांनी सांगितले.