महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आपल्यानंतर मुलांचे काय होणार? या विवंचनेतून पित्याने संपविले दोन मुलांना - murder

आजारपणाने त्रस्त असलेल्या पित्याने आपल्यानंतर आपल्या मुलांचे काय होणार? या विवंचनेतून आपल्या दोन मुलांची गळा आवळून हत्या केली.

मृत मुले

By

Published : Oct 9, 2019, 5:26 PM IST

मुंबई - आपल्यानंतर आपल्या मुलांचे काय होणार? या विवंचनेतून जन्मदात्या पित्याने आपल्या दोन मुलांची गळा आवळून हत्या केली. गौरवी चंद्रकांत मोहिते (वय 11 वर्षे) आणि प्रतिक चंद्रकांत मोहिते (वय 7 वर्षे), अशी त्या मुलांची नावे आहेत.

चंद्रकांत मोहिते (रा. इंदिरानगर, घाटकोपर पश्चिम, मुळ रा. रा. कोयना नगर, रासाटी, ता. पाटण, सातारा), असे खूनी पित्याचे नाव आहे. चंद्रकांत हा एका आजाराने ग्रस्त होता. त्यामुळे आपल्यानंतर आपल्या मुलांचा सांभाळ कोण करणार याची चिंता त्याला सतावत होती. काल (मंगळवार) तो आपल्या दोन्ही मुलांना घेऊन गरबा पाहायला जातो, असे नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर चारचाकीतून तो त्याच्या मुळगावी निघाला. परंतु, वाटेतच शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने आपल्या दोन्ही मुलांचा गळा आवळून खून केला.

हेही वाचा - जगनमोहनच्या गीताची शिवसेनेने केली हुबेहुब 'नक्कल'?

खूप वेळ होऊनही घरी न परतल्याने नातेवाईकांनी पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. याचा तपास महामार्ग पोलीस घेत होते. त्यांना मोहीते यांची चारचाकी शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळली. चारचाकीची तपासणी केली असता त्यामध्ये गौरवी आणि प्रतिक या दोघांचा मृतदेह आढळला. त्यांनी चंद्रकात मोहिते याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - 'मनसे' करणार का 'राज'कीय सीमोल्लंघन?

ABOUT THE AUTHOR

...view details