महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घाटकोपर कच्छ रत्न पुरस्काराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण - घाटकोपर कच्छ रत्न पुरस्कार

घाटकोपर गुजराती समाज व घाटकोपर कच्छ रत्न पुरस्कराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा देतेवेळी गुजराती भाषेत कच्छ समाजाचे कौतुक केले.

घाटकोपर कच्छ रत्न पुरस्कराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

By

Published : Jul 5, 2019, 11:40 AM IST

मुंबई- घाटकोपर गुजराती समाज व घाटकोपर कच्छ रत्न पुरस्कराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा देतेवेळी गुजराती भाषेत कच्छ समाजाचे कौतुक केले. यावेळी फडणवीस यांनी कच्छ भाषेत दोन शब्द बोलावे, अशी विनंती सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी, "जेथे शेकडो कच्छी वसे तेथे कच्छ बसे", असे म्हणताच सभागृहात टाळ्यांचा एकच गजर झाला.

घाटकोपर कच्छ रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

घाटकोपर कच्छ रत्न पुरस्कार हा कार्यक्रम घाटकोपरमध्ये गुरुवारी रात्री साडेआठ वाजता आयोजित करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री उशिराने रात्री दहा वाजता कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी मी मुद्दाम उशीरा आलो आहे, कारण कच्छ लोक सर्व व्यवसाय रात्री नऊ वाजता बंद करून येतात. असे सांगितले. तसेच कच्छ जेथे गेले तेथे ते दुधात साखर बनून राहतात. कच्छी मेहनती आहेत. असे म्हणत समाजाचे कौतुकही केले.

यांना मिळाला लाईफ टाईम अचिवमेन्ट पुरस्कार

कांती लाल भाई नरसी, शामजी भाई चोपडा, डॉ. जय रश्मी अनम, शैलेश भाई, चिममनलाल भाई, रश्मी अमरीश गाला, विमल परिमल जोशी, राजेशभाई शंभूभाई ठक्कर.

ABOUT THE AUTHOR

...view details