महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घाटकोपरमध्ये झाड कोसळून चार रिक्षाचे नुकसान; जीवितहानी नाही - rickshwo

विक्रोळी पार्कसाईटकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे झाड कोसळले, त्यावेळी जवळच्या इमारतीतील राहिवाशांनी अग्निशामक दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. यावेळी तातडीने अग्निशामक दलाने या झाडाचे तुकडे करून रस्ता एका बाजूने मोकळा केला.

घाटकोपरमध्ये झाड कोसळून चार रिक्षाचे नुकसान

By

Published : Jul 1, 2019, 8:51 PM IST

मुंबई - शहरात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. या पावसामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. यातच घाटकोपर येथील अमृतनगरमध्ये एक झाड कोसळून चार रिक्षांचे मोठे नुकसान झाले आही. ही घटना रविवारी रात्री १ च्या दरम्यान घडली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती स्थांनिकांनी दिली.

घाटकोपरमध्ये झाड कोसळून चार रिक्षाचे नुकसान
झाड पडल्याची ही घटना रात्री १ च्या सुमारास घडली. त्या दरम्यान कोसणाऱ्या झाडाचा मोठा आवाज झाला होता. त्यातच पावसाची संततधार सुरू होती. या झाडाच्या बाजूला दोन इमारती आहेत. विक्रोळी पार्कसईटकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे झाड कोसळले, त्यावेळी जवळच्या इमारतीतील राहिवाशांनी अग्निशामक दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. यावेळी तातडीने अग्निशामक दलाच्या जवानांनी ते झाड तोडून एका बाजूनेरस्ता मोकळा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details